Maharashtra: राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज

राज्यभरात पुढील आठवडाभर तरी आकाश ढगाळ आणि काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे
Maharashtra: राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज
Maharashtra: राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज Saam Tv

पुणे : राज्यभरात पुढील आठवडाभर तरी आकाश ढगाळ आणि काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाने राज्यभर हजेरी लावली होती. तसेच, काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसामुळे पिकांची मोठी हानी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. आता आठवडाभर तरी राज्यात ही स्थिती कायम राहणार आहे, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.

हे देखील पहा-

मॉन्सूनचा परतीचा प्रवास आणि बंगालच्या उपसागरात उत्तर अंदमानच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा अधिक सक्रिय झाल्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई, पुणे, नागपूर आदी शहरांसह राज्यात विविध भागात दुपारनंतर अचानक ढगांची गर्दी होत आहे. विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचे चित्र आठवडाभर पाहायला मिळाले आहे.

Maharashtra: राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज
उसाचा भुसा घेऊन जाणारा ट्रॅक्टर नदीच्या पुलावर पलटी; परळी- अंबाजोगाई वाहतूक विस्कळित

पुढील आठवड्यात मात्र सोमवार नंतर पावसाने काहीशी विश्रांती घेण्याची शक्यता असून, गुरुवारी (ता.१४) बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे परत एकदा पाऊस अधिक सक्रिय होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. शनिवारी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतेक ठिकाणी, तर उर्वरित राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाने हजेरी लावली होती.

उत्तर भारतातून मॉन्सून परतला आहे. शनिवार पर्यंत नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी उत्तर भारतातील बहुतेक भागातून माघार घेतली आहे. संपूर्ण राजस्थान, तसेच गुजरात, बिहार आणि झारखंडच्या उत्तर भागातूनही मॉन्सून परतला आहे. पुढील काही दिवस तरी मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी पूरक वातावरण असल्याचे हवामान खात्याने कळविले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com