मुंबईसह उपनगरांत पहाटेपासून पावसाची दमदार बॅटिंग; मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा

मुंबईकरांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
मुंबईसह उपनगरांत पहाटेपासून पावसाची दमदार बॅटिंग; मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा
RainSaam Tv

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून पावसाने (Rain) दडी मारली होती. सकाळी आभाळ दुपारी कडक ऊन यामुळे नागरिक हैराण झाले होते. मात्र, आता राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. मुंबईसह, ठाणे,डोंबिवली, पालघर, वसई विरार आणि कोकणातील काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे.

असे असले तरी मात्र, महाराष्ट्राच्या इतर भागात पावसाने दडी मारली आहे. शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीची तयारी केली आहे. मुंबईत (Mumbai) दडी मारलेल्या पावसाला पुन्हा आज पहाटे सुरुवात झाली आहे. त्यामुळं मुंबईकरांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

ठाण्यात पावसाचा जोर वाढला

ठाण्यात पावसाचा जोर वाढला असून सकाळी पासून पावसाची रिपरिप सुरू आहे. शहरात सर्वाच ठिकाणी म्हणजे नौपाडा, घोडबंदर रोड,पाचपाखाडी या ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. शहरात सकाळ पासून 4 झाडाच्या फांद्या कोसळल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

हे देखील पाहा -

डोंबिवली आणि परिसरात पावसाला सुरवात...

गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. सकाळी आभाळ दुपारी कडक ऊन यामुळे डोंबिवलीकर हैराण झाले. मात्र अखेर डोंबिवलीत आणि परिसरात पावसाला सुरवात झाली आहे त्यामुळे डोंबीवलीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

वसई विरारमध्ये पाऊस

वसई विरार मध्ये पावसाची हजेरी. गेल्या २ दिवसापासून पावसाची रिमझिम सुरु होती. मात्र आज सकाळ वसई विरारमध्ये पावसाची दमदार हजेरी. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून नागरीकांना पावसामुळे दिलासा मिळाला आहे.

Rain
मोठा दिलासा! सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट

पालघर जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी

पालघर जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी. पच्छिंम किनारपट्टी भागासह ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावली आहे. बोईसर,चिंचणी,बोर्डी परिसरात ढगांच्या गडगडाटसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. मागच्या काही दिवसांपासून या भागातील बळीराजा पावसाची आतुरतेने वाट पाहत होता. आज झालेल्या पावसाने खरीप हंगामातील शेतीच्या कामाला वेगाने सुरुवात होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, मुंबई आणि उपनगरात पावसाचा जोर वाढणार असून काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच पुढील दोन ते तीन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com