पुणे-मुंबईसाठी हेलिकॉप्टर सेवा सुरू; प्रवास होणार अवघ्या 40 मिनिटांत

खाजगी हेलिकॉप्टर Fly Blade India Pvt Ltd. द्वारे ही सेवा सुरु करण्यात येणार आहे.
पुणे-मुंबईसाठी हेलिकॉप्टर सेवा सुरू; प्रवास होणार अवघ्या 40 मिनिटांत
Jammu Kashmir: सैन्याचे हेलिकॉप्टर कोसळले; बचाव कार्य सुरूSaam Tv

पुणे - 16 ते 29 ऑक्टोबर दरम्यान पुणे विमानतळावरील व्यावसायिक विमान सेवा बंद आहे. या विमानसेवा बंद आल्यामुळे सणासुदीच्या काळात खाजगी हवाई सेवा सुरू करण्याची योजना आखली जात आहे. खाजगी हेलिकॉप्टर Fly Blade India Pvt Ltd. द्वारे ही सेवा सुरु करण्यात येणार आहे. यामुळे आता नागरिकांना जवळपास 40 मिनिटांत पुणे ते मुंबई असा प्रवास करता येणार आहे.

हे देखील पहा -

सध्या पुणे ते मुंबई दरम्यान कोणतीही उड्डाणे सुरू नाहीत. त्यामुळे नागरिकांसाठी हेलिकॉप्टर सेवा हा एकमेव हवाई पर्याय आहे. दररोज खर्डी ते जुहू ही हेलिकॉप्टर सेवा सुरू असेल. पुणे ते मुंबईसाठीचे एका व्यक्तीचे तिकीट १५०० रुपये असणार आहे. हेलिकॉप्टर दररोज सकाळी ९.३० वाजता खर्डी आणि जुहूतून संध्याकाळी ४.३० वाजता निघणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Jammu Kashmir: सैन्याचे हेलिकॉप्टर कोसळले; बचाव कार्य सुरू
"...म्हणून महाराष्ट्रभर MIM चे कार्यकर्ते करताहेत राष्ट्रवादीत प्रवेश"

या हेलिकॉप्टर सेवेमुळे पुणे-मुंबई दरम्यान रस्ते प्रवासासाठी लागणारे पाच तास वाचणार आहे. मागील आठवड्यात पुण्यासाठी हेलिकॉप्टर सेवा सुरु करणार अशी घोषणा विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिंया यांनी केली होती. या घोषणेनंतर प्रायव्हेट हेलिकॉप्टर कंपनी Blade India Pvt Ltd. यांनी देखील पुणे-मुंबई सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.