फुटपाथवर राहणाऱ्या दोन चिमुकल्यांची नालासोपारा मधील तरुणाने घडवून आणली हवाई सफर!

वरळी सिलिंक ते वसई विरार आणि ठाणे असा 40 मिनिटांची हवाई सफर घडवून आणली.
फुटपाथवर राहणाऱ्या दोन चिमुकल्यांची नालासोपारा मधील तरुणाने घडवून आणली हवाई सफर!
फुटपाथवर राहणाऱ्या दोन चिमुकल्यांची नालासोपारा मधील तरुणाने घडवून आणली हवाई सफर!चेतन इंगळे

नालासोपारा : नालासोपारा (Nalasopara) मध्ये राहणाऱ्या एका 23 वर्षीय यश माने (Yash Mane) या तरुणाने रस्त्यावर फिरून भीक मागून खाणाऱ्या दोन चिमकुल्यांच्या आयुष्या मधील पहिली हवाई यात्रा घडवून आणली आहे. (Helicopter travel for poor childrens)

हे देखील पहा -

देशाने कितीही प्रगती केली तरी देखील परिस्थितीच्या कारणास्तव किंवा शाररीक अपंगत्वामुळे आजही आपल्या देशातील प्रमुख शहरांमधील रस्त्यांवरती भीक मागणारी लहान मुलं दिसतात. कोणी त्यांना मदत करत किंवा कोणी दुर्लक्ष करुन निघून जात मात्र नालासोपारा मधील ऐका मोठ्या मनाच्या दिलदार तरुणाने याच भीक मागणाऱ्या मुलांना चक्क हेलिकॉप्टर (Helicopter) मधून हवाई सफर घडवून आणली आहे.

फुटपाथवर राहणाऱ्या दोन चिमुकल्यांची नालासोपारा मधील तरुणाने घडवून आणली हवाई सफर!
उदयनराजे भेटत नाहीत? तक्रार राहणार नाही! संकेतस्थळाचे लाेकार्पण

अंजली मोरम आणि रवी बेलपट्टी या 4 वर्षाच्या चिमुरड्यानं हेलिकॉप्टर मध्ये बसवून मुंबईच्या सांताक्रूझ येथून उड्डाण करत वरळी सिलिंक ते वसई विरार आणि ठाणे असा 40 मिनिटांची हवाई सफर या हेलिकॉप्टर दादा यश माने यांने करून दिली आहे. आपल्या आयुष्यातील या हवाई सफर चा आनंद घेऊन दोन्ही चिमुकल्यांचा आनंद गगनात मावत नव्हता.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com