Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांच्या बेहिशेबी मालमत्तेविरोधातील याचिकेवरील सुनावणीस हायकोर्टाचा नकार

उद्धव ठाकरे आणि कुटुंबाने बेहिशोबी मालमत्ता जमवली असल्याचा आरोप करत गौरी भिडे यांनी आणि त्यांच्या वडिलांनी ही याचिका दाखल केली होती.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySaam Tv

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thakceray) आणि त्यांच्या कुटुंबियांच्या बेहिशेबी मालमत्तेविरोधातील याचिकेवरील सुनावणीस हायकोर्टाने नकार दिला आहे. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अभय अहूजा यांच्या खडंपीठाने सुनावणीस नकार दिला आहे. गौरी भिडे आणि त्यांच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका दुसऱ्या खंडपीठापुढे नेण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी एवढी मालमत्ता जमवली आहे, त्यांच्या उत्पन्नाचा नेमका स्त्रोत काय आहे याची चौकशी व्हावी. त्यांच्याकडे असलेली संपत्ती कुठू आली याची माहिती सर्वांना मिळायला हवी, असा आरोप भिडे यांनी केला होता. (Latest Marathi News)

Uddhav Thackeray
ठाकरे गट आक्रमक; हिवाळी अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकारला घेरणार, कशी असेल रणनीती?

प्रबोधन प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेडच्या सामना वृत्तपत्राचा कोरोना काळातील टर्नओव्हर 42 कोटी रुपये होता. या काळात सर्व वृत्तपत्र तोट्यात असताना सामना नफ्यामध्ये होता. या सर्वांची चौकशी व्हावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी हायकोर्टात केली होती.

Uddhav Thackeray
Sanjay Raut : येत्या दोन महिन्यांत शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार? संजय राऊतांचं मोठं विधान

ठाकरे कुटुंबियांची संपत्ती

निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार उद्धव ठाकरेंची एकूण संपत्ती जवळपास 125 कोटींची आहे. यामध्ये 22 कोटींची शेअर्समधील गुंतवणूक आहे. 1 कोटी 61 लाखांची एफडी, मातोश्री आणि मातोश्रीसमोरील दोन घरं यांची किंमत 52 कोटी आहे. तसेच कर्जतमध्ये एक फार्म हाऊस आहे.

रश्मी ठाकरे यांची 35 लाखांची एफडी आहे. तर शेअर्स आणि बॉण्डमध्ये 34 कोटींची गुंतवणूक आहे. 6 कोटी किमतीची जमीन त्यांच्या नावे आहे. तर आदित्य ठाकरे यांच्या संपत्तीत एफडीमध्ये 10 कोटींची गुंतवणूक आहे. शेअर्स आणि बॉण्डमध्ये 20 लाखांची गुंतवणूक आहे. गाळे, जमीन अशी जवळपास 5 कोटींची संपत्ती त्यांच्या नावे आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com