Narendra Dabholkar: दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा होणारच; गृहमंत्र्यांचे स्पष्टीकरण

सार्वजनिक क्षेत्रात काम करण्याऱ्या लोकांचा विचारच संपवायचा त्यांना जगु द्यायचे नाही त्रास द्यायचा अशा विचारधारा देशात रुजली आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर
डॉ. नरेंद्र दाभोलकरSaam TV

पुणे : नरेंद्र दाभोलकर ( Narendra Dabholkar ) हत्या प्रकरणातील आरोपींना साक्षीदारांनी ओळखल्यानंतर या आरोपींवर कठोर शिक्षा होणार असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Home Minister Dilip Walse-Patil) यांनी सांगितलं ते आज आंबेगाव तालुक्याच्या दौरावर होते या दरम्यान माध्यमांशी बोलत होते.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनाचा आरोप ज्या आरोपींवर ठेवण्यात आला आहे ते दोन आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने ओळखल्यानंतर त्यांच्यावरती कडक कारवाई होणार असल्याचं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे

डॉ. नरेंद्र दाभोलकर
आघाडीबाबत इम्तियाज जलील ओवेसींसोबत घेणार शरद पवारांची भेट

ते म्हणाले, देशात नवीन वातावरण असुन विचार स्वातंत्र्यावर आणि सार्वजनिक क्षेत्रात काम करण्याऱ्या लोकांचा विचारच संपवायचा त्यांना जगु द्यायचे नाही त्रास द्यायचा अशा विचारधारा देशात रुजली असून त्यातुनच दाभोलकर हत्या प्रकरण घडल्याच गृहमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी MIM सोबत युती करणार नसल्याचं जाहीर केल्या नंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी महाविकास आघाडीसोबत MIM येणार का नाही? या संदर्भात पक्षाचे अध्यक्ष पवार साहेब हे माध्यमा सोबत बोलतील असं म्हणत एसआयएम सोबत युतीबाबत स्पष्ट बोलण्यास नकार दिला.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com