Pune : लॉजवर मुक्कामासाठी थांबला अन् 'हनी ट्रॅप'मध्ये अडकला! तरुणीने उकळली ६७ लाखांची खंडणी

Pune Honey Trap News | या तरुणीने तरुणाला मैत्रीच्या जाळ्यात अडकवून तिच्या साथीदारांच्या मदतीने तरुणाकडून तब्बल ६७ लाख रुपयांची खंडणी उकळली आहे.
Pune Honey Trap News
Pune Honey Trap NewsSaam TV

सचिन जाधव

पुणे: लॉजवर (Lodge) मुक्कामासाठी थांबणं एका तरुणाला महागात पडलं आहे. पुण्यात एका तरुणाला एका तरुणीने हनी ट्रॅपमध्ये (Honey Trap News) अडकवत त्याला ब्लॅकमेल (Blackmail) करत त्याच्याकडून तब्बल ६७ लाख रुपयांची खंडणी (Extortion) उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या तरुणीने तरुणाला मैत्रीच्या जाळ्यात अडकवून तिच्या साथीदारांच्या मदतीने त्या तरुणाकडून तब्बल ६७ लाख रुपयांची खंडणी उकळली आहे. त्यानंतरही पैशांसाठी तरुणीकडून मिळणाऱ्या धमक्‍यांमुळे तरुणाने पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी खंडणी उकळणाऱ्या तरुणीच्या दोन साथीदारांना बेड्या ठोकल्या आहेत. (Pune Crime News)

हे देखील पाहा -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणाच्या चुलत भावाचा कोंढवा (Pune) परिसरात खडी मशीनचा व्यवसाय आहे. तो चुलतभावाच्या कंपनीत पर्यवेक्षक म्हणून काम करत असल्याने त्याच्याकडे खडी मशिनचे सर्व आर्थिक व्यवहार आहेत. मागील वर्षी जानेवारी महिन्यात तरुण नगर रस्त्यावरील कोरेगाव भीमा परिसरात गेला होता. त्यावेळी तेथील एका लॉजवर तो मुक्कामासाठी थांबला होता. तेव्हा, अनोळखी तरुणाने त्यास एका तरुणीचा मोबाइल क्रमांक देऊन तिला संपर्क साधण्यास सांगितले होते. त्यानंतर दोघांची ओळख होऊन गाठीभेटी वाढल्या. त्यानंतर त्याने तरुणीला वेळोवेळी आर्थिक मदत केली. तसेच दुचाकीसाठी २५ हजार रुपयेही दिले. (Pune Honey Trap News)

दरम्यान, तरुणीने त्याच्याकडे सातत्याने पैशांसाठी तगादा लावला, तसेच "मी गर्भवती असून याबाबत पतीला माहिती देणार आहे' असे सांगून तिने फिर्यादीला धमकाविण्यास सुरुवात केली. तरुणाने घाबरून हिंगमिरे यास पैसे दिले. तर निखिल म्हेत्रे याने तरुणाला वाघोली येथे बोलावून जीवे मारण्याची धमकी दिली. त्याच्याकडून वेळोवेळी पेसे उकळले, ही एकुण रक्कम तब्बल ६७ लाख ६ हजार रुपये एवढी आहे. (Pune Blackmail News)

Pune Honey Trap News
Ambernath News : अंबरनाथ शहर हादरले; सख्ख्या भावंडांवर दिवसाढवळ्या गोळीबार

या प्रकाराला कंटाळून तरुणाने गुन्हे शाखेच्या पोलिसांकडे तक्रार नोंदविली. गुन्हे शाखेच्या युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि त्यांच्या पथकाने दोन्ही आरोपींना अटक केली. चेतन रवींद्र हिंगमिरे (रा. काळेपडळ, हडपसर), निखील उर्फ गौरव ज्ञानेश्वर म्हेत्रे (रा.गाडीतळ हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी एका तरुणीसह तिघांविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन हिंगमिरे हा सराईत गुन्हेगार आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com