Mumbai Crime News: मुंबई शहर हादरलं! वसतीगृहातील तरुणीवर अत्याचार करून हत्या

Mumbai Crime News: मुंबईतील महिलांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित होणारी घटना घडली आहे.
mumbai crime news
mumbai crime newsSaam Tv

Mumbai Crime News: मुंबईतून एक धक्कादाय घटना समोर आली आहे. मुंबईतील महिलांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित होणारी घटना घडली आहे. मुंबईत एक वसतीगृहातील एका अत्याचार करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील चर्चगेट परिसरात असलेल्या मुलींच्या वसतीगृहात एका तरुणीवर अत्याचार करून तिची हत्या झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने वसतीगृहाच्या आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

mumbai crime news
Bihar Crime News: अल्पवयीन भाचा मामीच्या प्रेमात; अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केलं, अन्...

या घटनेने मुंबईतील महिला सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चर्चगेटमधील सावित्रीबाई फुले वसहतीगृह मरीन ड्राइव्ह येथील १९ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. वसहतीगृहाच्या सुरक्षारक्षकाने हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे.

पोलिसांनी वसतीगृहातील मुलीच्या खोलीचा दरवाजा उघडल्यानंतर ही घटना समोर आली. या वसतीगृहाचा सुरक्षारक्षक बेपत्ता झाला होता. या सुरक्षारक्षकाने तरुणीच्या हत्येनंतर ट्रेन खाली उडी मारून आत्महत्या केली आहे.

मुंबईत ४३ वर्षीय व्यक्तीची मुलाने केली हत्या

आईवरून चिडवल्याच्या रागातून तरुणाने एका व्यक्तीला बेदम मारहाण करत त्याची हत्या केली आहे. अब्दुलरहीम जैफुल मलिक असं मृत व्यक्तीचं नाव आहे. अब्दुल ४३ वर्षीय व्यक्ती असून अवघ्या १७ वर्षांच्या मुलाने त्याची हत्या केली आहे. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

mumbai crime news
Crime News : सातारा, गाेंदिया, वाशिम, काेपरगावात पाेलिसांची धडाकेबाज कारवाई; गुटखा, पान मसाल्यासह लाखोंचा मुद्देमाल जप्त

स्क्रू ड्रायव्हरने केले वार

अब्दुलने मुलाच्या आईवरून त्याला चिडवलं होतं. याचा त्याला फार राग आला. आपल्या आईबद्दल अब्दुलने वापरलेले शब्द त्याच्या काळजात घाव करून गेले. त्याने पुढचा मागचा कसलाही विचार न करता स्क्रू ड्रायव्हरने अब्दुलच्या मानेवर आणि डोक्यात सपासप वार केले. कांदिवलीमधील इरणीवडी परिसरात ही घटना घडली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com