कोरोनामुळे हॉटेल व्यवसायिकाची आत्महत्या

विरार मधील आर्थिक तंगीला कंटाळून एका हॉटेल व्यवसाईकाने हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
कोरोनामुळे हॉटेल व्यवसायिकाची आत्महत्या
कोरोनामुळे हॉटेल व्यवसायिकाची आत्महत्या चेतन इंगळे

विरार : विरार Virar मधील आर्थिक तंगीला कंटाळून एका हॉटेल Hotel व्यवसाईकाने हॉटेलमध्ये आत्महत्या Suicide केल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात अर्नाळा Arnala पोलिसांनी Police अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांना एक चिट्ठी मिळाली आहे. Hotel business Suicide

त्यानुसार पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विरार पश्चिम येथील ग्लोबल सीटी परिसरात असलेल्या स्टार प्लानेट या हॉटेल संचालक करुणाकर पुत्रन (वय- ४१) यांचा मृतदेह गुरुवारी सकाळी ९ च्या सुमारास हॉटेल मधील छताला लटकलेला अवस्थेत आढळून आले होते.

हे देखील पहा-

पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली असता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्चेदानासाठी पाठविण्यात आले आहे. पोलिसांना या ठिकाणी एक पत्र मिळाले आहे. त्यामध्ये अनेक दिवसापासून हॉटेल चालत नसल्याने, आर्थिक तंगी निर्माण झाली आहे, त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचल्याचे त्या पत्रात म्हटले आहे. Hotel business Suicide

 कोरोनामुळे हॉटेल व्यवसायिकाची आत्महत्या
डॉ. शेळके आत्महत्या प्रकरण; कर्मचारी अधिकाऱ्यांच्या पाठिशी

सध्या पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. कोरोना काळात हॉटेल बंद असल्याने, अनेक हॉटेल व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आर्थिक टाळेबंद जुळत नसल्याने, कर्जबाजारी झाले आहेत. यामुळे अशा घटना घडत असल्याची खंत हॉटेल व्यावसाईक व्यक्त करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com