उधारीचे बिल मागितल म्हणून हॉटेल मॅनेजरला बेदम मारहाण; हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मारहाणीचा घटना सीसीटीव्ही मध्ये कैद...
Hill Line Police Station
Hill Line Police StationSaam Tv

कल्याण - उधार दिलेल्या जेवणाचा बिलाची मागणी  हॉटेल मॅनेजरच्या चांगलंच अंगलट आलं आहे. डोंबिवली-बदलापूर पाईपलाईन रोडवरील सागर हॉटेल मध्ये बुधवारी रात्री १०:३० वाजता हा प्रकार घडला आहे. आठ जणांच्या टोळक्याने हॉटेल मॅनेजरला बेदम मारहाण केली. हिललाईन पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना सीसीटीव्ही (CCTV) मध्ये कैद झाली आहे.

हे देखील पाहा -

डोंबिवली-बदलापूर पाईपलाईन रोडवरील सागर हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कृष्णा मान या हॉटेल मॅनेजरला बेदम मारहाण करण्यात आली आहे. महामार्ग लगत असलेल्या पाले गावातील देवराम वारिंगे व त्याच्या अन्य सात साथीदारांनी या हॉटेल मॅनेजरला बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काही झाली आहे. याप्रकरणी हिललाईन पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला आहे.

Hill Line Police Station
Petrol Diesel: देशात पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त? कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण

देवराम वारींगे व त्याचे साथीदार सध्या ग्रामीण भागातील हॉटेल्स आणि ढाब्यांवर जाऊन उधारी जेवण करून आपली दहशद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. वारिंगे याच्या सहकार्याला विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मराठा सेक्शन मधील तरुण देखील येत आहेत.त्यामुळे ग्रामीण भागात दहशद निर्माण करणाऱ्या या शहरी गुंडांचा वेळीच बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी तातडीने कारवाई करणे आवश्यक झाले आहे.त्यामुळे हे फरार आरोपी कधी पोलिसांच्या हाती लागणार हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com