कल्याणमध्ये घर काम करणाऱ्या महिलेची हत्या; पतीवर संशय

मयत महिलेचे नाव लक्ष्मी मोहिते असे असून ती त्याच परिसरात घरकाम करत असे.
कल्याणमध्ये घर काम करणाऱ्या महिलेची हत्या; पतीवर संशय
कल्याणमध्ये घर काम करणाऱ्या महिलेची हत्या; पतीवर संशयप्रदिप भणगे

प्रदिप भणगे

कल्याण: कल्याण पश्चिमेकडील हाय प्रोफाईल गांधारी परिसरात दिवसाढवळ्या एका घर काम करणाऱ्या महिलेच्या हत्येने खळबळ उडाली आहे. हत्येचा संशय महिलेच्या पतीवर असून खडकपाडा पोलिस या हत्येचा तपास करीत आहेत.

कल्याण (Kalyan Murder Case) पश्चीमेतील हाय प्रोफाईल गांधारी परिसरात रिंग रोड रस्त्याचे काम सुरु आहे. या रस्त्यावर एका महिलेचा मृतदेह सकाळी आढळून आला. याची माहिती तेथील नागरिकांनी खडकपाडा पोलिसांना दिली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक पवार आणि पीआय शरद जिने हे पोलिस पथकासमोत घटनास्थळी दाखल झाले. मयत महिलेचे नाव लक्ष्मी मोहिते असे असून ती त्याच परिसरात घरकाम करत असे.

लक्ष्मी ही भिवंडीतील सावद गाव परिसरात राहत होती. लक्ष्मीची हत्या तिचा पती जर्नादन मोहिते याने केली असल्याचा संशय पोलिसांना आहे. आज सकाळी साडेनऊच्या दरम्यान ही घटना घडली असून जालना जिल्ह्यात राहणारा जनार्दन मोहिते सध्या बेपत्ता आहे. लक्ष्मीची हत्या दगडाने ठेचून करण्यात आली आहे. या महिलेच्या हत्येने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com