खड्ड्यांवरून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची शिवसेनेवर टीका

गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी ठाणे, कल्याण-डोंबिवली मधील खड्ड्यांवरून शिवसेनेवर टीका केली आहे.
खड्ड्यांवरून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची शिवसेनेवर टीका
खड्ड्यांवरून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची शिवसेनेवर टीका प्रदीप भणगे

डोंबिवली : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आज डोंबिवलीत कार्यालयाच्या उद्घाटनसाठी आले होते. यावेळी डोंबिवली राष्ट्रवादी तर्फे कार्यकर्त्यांचा मेळावा भरवण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी ठाणे, कल्याण-डोंबिवली मधील खड्ड्यांवरून शिवसेनेवर टीका केली आहे. आव्हाड यांनी सांगितले, एक काळ असा होता की कळवा-मुंब्रा मध्ये सर्वात जास्त खड्डे होते. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. गेल्या 10 वर्षात ठाणे, कल्याण डोंबिवली व इतर शहरात खड्डे असतात.

हे देखील पहा :

मुंब्रा शहरात रस्त्याच्या कामात वापरण्यात येणारे काँक्रीटसुद्धा मी तपासून पाहत होतो. त्यामुळे मुंब्रामध्ये रस्त्यांवर खड्डे आढळून येणार नाहीत. आपल्याला परिश्रम घ्यावे लागतात तेव्हा हे दिसते असा टोला देखील त्यांनी शिवसेनेला लगावला आहे. आव्हाड यांना पत्रकारांनी आरएसएस ने इन्फोसिस मॅगझीनच्या माध्यमातून राष्ट्रविरोधी शक्ती देशात आर्थिक अस्थैर्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका केली होती, यावर आपली प्रतिक्रिया काय असे विचारले असता आव्हाडांनी सांगितले की इन्फोसिस आपल्या भारताला किती रिव्हेन्यू देते याचा विचार केल्यावर कुणी एक शब्द देखील बोलणार नाही असे म्हटले.

खड्ड्यांवरून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची शिवसेनेवर टीका
प्रेमात धोका झाल्याने आत्महत्या करायला गेलेल्या तरुणाचा पोलिसांनी वाचवला जीव!

तिसऱ्या लाटेला हलक्यात घेऊ नका सल्ला देणाऱ्या जितेंद्र आव्हाडांच्या मेळाव्यात कोरोना नियमांचं उल्लघन

डोंबिवली पूर्वेकडील रामनगर परिसरात राष्ट्रवादीच्या कार्यालयाचे उद्घाटन तसेच राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळाव्यासाठी आज गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड डोंबिवलीत आले होते. कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून अनेक सल्ले दिले. असाच एक सल्ला कोरोना बाबत दिला तिसरी लाट हलक्यात घेऊ नका हा व्हेरिएंट खूप धोकादायक आहे. मात्र, प्रत्यक्षात याच मेळाव्यात कोरोनाबाबत कोणत्याही नियमांच पालन करण्यात आलं नव्हतं ,सोशल डिस्टसिंग सोडाच पण बहुतांश कार्यकर्त्यांना मास्कचा देखील विसर पडल्याचे दिसून आले . सर्व सर्वसामान्यांवर कारवाईचा बडगा उघडणाऱ्या पालिका प्रशासन व पोलीस या मेळाव्यांवर काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com