विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक कशी होणार, अध्यक्षपदाकरता कोणती नावे चर्चेत?
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक कशी होणार, अध्यक्षपदाकरता कोणती नावे चर्चेत?Saam Tv

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक कशी होणार, अध्यक्षपदाकरता कोणती नावे चर्चेत?

विधानसभेच्या अध्यक्षपदाकरिता अनुभवी नेत्याची निवड व्हावी, असा मुद्दा नेहमी पुढे येत असल्याने माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव अध्यक्षपदाकरिता पुन्हा चर्चेत आले

मुंबई : विधानसभेच्या अध्यक्षपदाकरिता (Assembly Speaker) अनुभवी नेत्याची निवड व्हावी, असा मुद्दा नेहमी पुढे येत असल्याने माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांचे नाव अध्यक्षपदाकरिता पुन्हा चर्चेत आले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्याचे देखील त्यावर एकमत होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे विधानसभा अध्‍यक्षपदी आमदार चव्हाण यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

आज हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभा (Assembly) अध्यक्षपदाची निवडणूक (Election) ही आवाजी मतदान पद्धतीने घेण्याविषयी निर्णय होणार असल्याचे समजत आहे. यानंतरच अध्यक्षाची निवड केली जाणार आहे. विधानसभेच्या अधिवेशनात पहिल्या दिवशी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्षपदाची निवड गुप्त मतदानाऐवजी आवाजी पद्धतीने घेण्यात यावी, असा प्रस्ताव मांडला होता.

हे देखील पहा-

यामुळे आज आवाजी पद्धतीने अध्यक्षाची निवड होण्याची शक्यता आहे. अधिवेशनात आज नियम समिती या प्रस्तावाचे अवलोकन करून आवाजी मतदानाने अध्यक्षपद निवड करण्याविषयी निर्णय घेऊ शकते. याकरिता सूचना आणि हरकतींचा विचार करुन दुपारपर्यंत विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या पद्धतीविषयीचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रासह (Maharashtra) उत्तर प्रदेश, तमिळनाडू, तेलंगण, आंध्र प्रदेश या राज्यात विधानसभा आणि विधान परिषदमध्ये अध्यक्ष निवडीविषयी गुप्त मतदानाची पद्धत आहे. हाच नियम महाराष्ट्रामध्ये बदलण्यात आले आहे. दरम्यान, काँग्रेसकडून येत्या सोमवारी अध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे, असेही सांगण्यात येत आहे.

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक कशी होणार, अध्यक्षपदाकरता कोणती नावे चर्चेत?
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुक; 21 जागांपैकी 14 जागा बिनविरोध

अध्यक्षपदासाठी कोणती नावे चर्चेत

विधानसभा अध्यक्षपद काॅंग्रेसकडे राहणार आहे. यामुळे काॅंग्रेसमधून अध्यक्ष पदाकरिता संग्राम थोपटे (Sangram Thopte), तर शिवसेनेकडून काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावासाठी आग्रह असल्याचे समजत आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com