HSC Board Result Date Announced: प्रतीक्षा संपली! बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, कुठे पाहता येणार निकाल?

Maharashtra HSC Board Result Date: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळांवर जाहीर होणार आहे.
HSC Result
HSC ResultSaam Tv

HSC Board Result Tomorrow: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. बारावीचा निकाल उद्या म्हणजेच 25 मे रोजी लागणार आहे. लाखो विद्यार्थी आणि त्याचे पालकांचं बारावीच्या निकालाकडे लक्ष लागलं होतं.

बारावीचा निकाल उद्या दुपारी 2 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळांवर जाहीर होणार आहे. राज्यात 21 फेब्रुवारी ते 21 मार्च दरम्यान बारावीची परीक्षा पार पडली होती. सुमारे 14 लाख विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. (Latest News Update)

HSC Result
SBI Job Alert: स्टेट बँकेत बक्कळ पगाराच्या नोकरीची संधी, परीक्षा द्यायचीही गरज नाही, वाचा प्रक्रिया

कुठे पाहता येईल निकाल?

बारावीचे विद्यार्थी https://www.mahahsscboard.in mahresult.nic.in, hscresult.mkcl.org, mahresults.org.in या संकेतस्थळावर आपले निकाल पाहू शकतात.

यासाठी विद्यार्थ्यांना बारावीचा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर हॉल तिकीट क्रमांक आणि इतर डिटेल्स भरल्यानंतर तुमचा निकाल तु्म्हाला कळेल. विद्यार्थी आपला निकाल डाऊनलोड देखील करु शकतात.

HSC Result
Vasai-Virar MNS News: वसई-विरारमध्ये मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी ठाकरे गटात करणार प्रवेश

SMS निकाल कसा पाहाल?

विद्यार्थ्यांना SMS द्वारेही आपला निकाल पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना मेसेज बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाकून 57766 या क्रमांकावर सेंड करावा लागणार आहे. यानंतर त्याच मोबाईल नंबरवर तुम्हाला तुमचा निकाल पाहता येईल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com