Mumbai : जेव्हीएलआर रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी; रुग्णवाहिकेलाही फटका
Traffic Jam On Jogeshwari-Vikhroli Link Road in Mumbaiजयश्री मोरे

Mumbai : जेव्हीएलआर रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी; रुग्णवाहिकेलाही फटका

Traffic Jam On Jogeshwari-Vikhroli Link Road in Mumbai : रुग्णाचे नातेवाईक थेट वाहन धारकांना हात जोडत रुग्णवाहिका बाहेर काढत रुग्णालयाच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते.

मुंबई: विक्रोळी पूर्व द्रुतगती मार्गावर जेव्हीएलआर म्हणजेच जोगेश्वरी-विक्रोळी लिंक (Jogeshwari-Vikhroli Link Road - JVLR) रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाली आहे. जेव्हीएलआर रोड ज्या ठिकाणी सुरू होतो, त्या ठिकाणी असलेला ब्रिज (Bridge) हा दुरुस्तीच्या कामासाठी आजपासून पुढील १० दिवस ब्रिज बंद असणार आहे, त्यामुळे आता याचा फटका वाहनचालकांना बसला (Huge traffic jam on JVLR Road; The ambulance was also trapped in traffic jam)

हे देखील पाहा -

आज सकाळपासूनच विक्रोळी पूर्व द्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. याचा फटका रुग्णवाहिकांना (Ambulance) देखील बसला आहे. यात एका रुग्णवाहिकेतून रुग्णांचे नातेवाईक थेट वाहन धारकांना हात जोडत रुग्णवाहिका बाहेर काढत रुग्णालयाच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे. आज शनिवार सुट्टीचा दिवस आणि त्यात वाहतूक कोंडी यामुळे वाहनचालकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

Traffic Jam On Jogeshwari-Vikhroli Link Road in Mumbai
इंधन दरवाढ-महागाई विरोधात ठाण्यात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांचं आंदोलन

जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड उड्डाणपूल १० दिवस बंद राहणार आहे. जोगेश्वरी (पश्चिम) मधील लिंक रोडला पूर्वेकडील जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (JVLR) ला पश्चिम द्रुतगती महामार्ग (WEH) वर जोडणारा हा उड्डाणपूल आहे. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड उड्डाण पुलाच्या विभिन्न भागांतील सांधे भरण्याचे काम १३ ते २४ मे दरम्यान केले जाणार आहे. या काळात पूल वाहतुकीसाठी पूर्णत: बंद राहणार आहे. मात्र यादरम्यान वाहतूक उड्डाणपुलाखालून सुरु राहणार आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.