उल्हासनगरमध्ये पती- पत्नीची गळफास घेवून आत्महत्या

उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. उल्हासनगरच्या गांधीनगर भागात राहणाऱ्या पती पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
उल्हासनगरमध्ये पती- पत्नीची गळफास घेवून आत्महत्या
उल्हासनगरमध्ये पती- पत्नीची गळफास घेवून आत्महत्याSaam TV

उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. उल्हासनगरच्या गांधीनगर भागात राहणाऱ्या पती पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मृतक पती पत्नीचे नाव सचिन सुतार, शर्वरी सुतार असे आहे. कॅम्प क्रमांक एक येथील राजीव गांधी नगरमध्ये ही घटना घडली आहे. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. रविवारी सकाळी त्यांची मुले झोपेतून उठल्यावर त्यांनी घराचे दार उघडून झालेला प्रकार शेजारील नागरिकांना कळवला. स्थानिक रहिवासी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी शहरजिल्हाध्यक्ष संजय घुगे यांनी याबाबतची माहिती उल्हासनगर पोलिसांना दिली.

उल्हासनगरमध्ये पती- पत्नीची गळफास घेवून आत्महत्या
ज्यांनी Air India विकली, आता रेल्वे विकायला निघालेत त्यांना ST वर बोलण्याचा अधिकार नाही

उल्हासनगर राजीव गांधीनगर परिसरात राहणारे सचिन सुरेश सुतार फर्निचरचे तर पत्नी शर्वरी घरकाम करीत होती. त्यांना पराग व यशार्थ असे दोन ५ ते ६ वर्षाची दोन अपत्ये आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते बेरोजगार असल्याने, घरात आर्थिक अडचण जाणवत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिली. दरम्यान दिवाळीसाठी कोकण रत्नागिरी येथील गावी गेलेले सुतार कुटुंब शनिवारी गावावरून परतले होते. अशी प्राथमिक माहिती स्थानिक रहिवास्यांनी दिली. शनिवारी मध्यरात्री मुले झोपल्यानंतर दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलीसांनी प्राथमिक तपासात व्यक्त केला आहे. रविवारी सकाळी दोन्ही मुले झोपेतून उठल्यावर आई-वडील लटकलेल्या अवस्थेत त्यांना दिसल्यावर, त्यांनी घराचे दार उघडून शेजाऱ्यांना सदर माहिती दिली, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मनसेचे माजी शहाराध्यक्ष संजय घुगे यांनी दोन्ही मुलांना घराबाहेर ठेवून उल्हासनगर पोलिसांना झालेल्या प्रकरणाची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करीत दोन्ही मृतदेह मध्यवर्ती रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले आहेत. मयत सचिन सुतार यांचे आई-वडील व भाऊ डोंबिवली येथे राहत असून त्यांना सदर प्रकाराबाबत माहिती देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी दिली आहे, त्याचबरोबर उल्हासनगर पोलाीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com