प्रत्येक जन्मी अशीच पत्नी मिळावी; बायकोसाठी नवरोबांनी केली वट पौर्णिमा साजरी

महिला वर्गही पुरुषाच्या या उपक्रमाच कौतुक करत आहेत.
प्रत्येक जन्मी अशीच पत्नी मिळावी; बायकोसाठी नवरोबांनी केली वट पौर्णिमा साजरी
Pune News, Vat Purnima 2022 NewsSaam Tv

पुणे - आधुनिक सावित्री तिच्या सत्यवानाला दीर्घ आयुष्य लाभो म्हणून वट पौर्णिमेला महिला वडाची पूजा करताना पाहावयास मिळते, पण हीच सावित्री पुढचे सात जन्म मला मिळावी, तिला दीर्घायुष्य मिळावे म्हणून कोणी पुरुष वडाची पूजा करताना दिसत नाहीत, मात्र पिंपरी-चिंचवड मध्ये काही सत्यवानाणी आपल्या सावित्री साठी वडाची (Vat Purnima) पूजा केली आहे. (Vat Purnima 2022 News)

तुम्हाला थोडंस आश्चर्य वाटलं असेल. पण हे खर आहे. पिंपरी-चिंचवडच्या (Pimpri Chinchwad) सांगवी परिसरात सत्यवान सावित्री साठी वडाची पूजा करताना दिसले. मानव हक्क समितीच्या वतीन या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं. त्यामुळेच सावित्री ऐवजी सांगवी मध्ये अनेक सत्यवान वडाची पूजा करताना दिसले.

हे देखील पाहा -

प्रत्येक महिला आपल्या पतीला वटवृक्षाप्रमाण आयुष्य लाभाव आणि सात जन्मी तोच नवरा मिळावा यासाठी वटसावित्रीची पूजा करते. मात्र या आधुनिक युगामध्ये स्त्री-पुरुष समानता आहे. असे म्हणताना स्त्रियां प्रमाणेच हाच सण पुरुषांना प्रत्येक जन्मी तिच पत्नी लाभावी, तिलाही दिर्घायुष्य लाभावे, यासाठी सत्यवानाणी आपल्या सावित्री साठी वडाची पूजा केली आहे.

वास्तविक पाहता वटपौर्णिमा हा महिलांचा सन आहे. पण स्त्री पुरुष समानतेच्या काळात स्त्रीयांना समानतेचा दर्जा देण्याच्या उद्देशान पुरुषांनी वडाची पूजा केल्याने महिला वर्गही पुरुषाच्या या उपक्रमाच कौतुक करत आहेत.

Pune News, Vat Purnima 2022 News
ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे पहिल्याच पावसात चार गावांचा संपर्क तुटला...

तर दुसरीकडे या उलट औरंगाबादेत वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी पुरूषांनी पिंपळपौर्णिमा साजरी केली आहे. पुढील ७ जन्मच काय ७ सेकंद सुद्धा अशी बायको नको, अशा घोषणा देत औरंगाबादेत पुरूषांनी पिंपळाच्या झाडाला उलट्या 108 प्रदक्षिणा घालत पूजन केले आहे. औरंगाबादेतील वाळूज परिसरात पत्नी पीडित पुरूषांनी ही अनोखी पिंपळपौर्णिमा साजरी केली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com