वसई मर्सेस परिसरात एका महिलेने पतीचा करोनाने (Coronavirus) मृत्यू झाल्याने शोकात गळफास घेवून आत्महत्त्या केल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात वसई पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
वसईच्या मर्सेस गावात राहणाऱ्या स्वाती डीसल्वा (३५) या महिलेने कोरोनाने पतीचा मृत्यू झाल्याने दुखात राहत्या घरी मंगळवारी आत्महत्त्या केली. स्वातीचा पती विवेक डीसल्वा (३९) हे काही दिवसांपूर्वी परराज्यात जावून आले होते. त्यांना करोनाची सौम्य लक्षण जाणवत होती. दरम्यान सासू सासऱ्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
दरम्यानच्या काळात पतीची लक्षणे वाढली आणि त्यांना स्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला असता त्याला सुद्धा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. या दुखात स्वाती घरी आली आणि तिने घरात येवून गळफास घेवून आत्महत्त्या केली.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.