Kalyan News : पत्नीच्या चारित्र्यावर होता संशय; पत्नीने केलं भयावह कृत्य

नागरिकांनी पतीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं.
Kalyan Crime News
Kalyan Crime NewsSaam TV

कल्याण : चारित्र्यावर संशय घेत संतापलेल्या पतीने पत्नीवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली. तिला तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. ही केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास क्याण स्कायवॉकवर घडली. हल्ल्यानंतर पतीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. (Kalyan Crime News)

Kalyan Crime News
Maharashtra Politics : ...तर शिंदे शहीदच झाले असते; दीपक केसरकर काय म्हणाले? वाचा...

प्रवीणा पाटील असं गंभीर जखमी झालेल्या महिलेचं नाव आहे. तर विकास पाटील असं आरोपी पतीचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विकास हा आपल्या पत्नी प्रवीणासह कल्याणजवळच्या आंबिवली परिसरात राहतो. विकासला प्रवीणाच्या चारित्र्यावर संशय असल्यामुळे त्यांच्यात वारंवार खटके उडत होते.

शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास दोघेही कल्याण स्टेशन परिसरातील स्कायवॉकवरून जात होते. तेव्हा पुन्हा दोघांमध्ये वाद झाला. या वादातून संतापलेल्या विकासने प्रवीणावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात प्रविणाच्या मानेवर, गळ्यावर, छातीवर गंभीर दुखापत झाली. (Kalyan Todays News)

Kalyan Crime News
...तर माझे कार्यकर्ते तंगडं तोडतील; शिंदे गटातील आमदाराने अधिकाऱ्यांना दिला दम

हल्ल्यानंतर विकासने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र परिसरातील नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. त्यानंतर जखमी अवस्थेत प्रवीणाला कल्याण मधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या घटनेचा पुढील तपास महात्मा फुले पोलीस करीत आहेत.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com