तरसाचा दोघांवर हल्ला, थरार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद (पहा व्हिडिओ)

तरसाच्या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी
तरसाचा दोघांवर हल्ला, थरार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद (पहा व्हिडिओ)
तरसाचा दोघांवर हल्ला, थरार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद (पहा व्हिडिओ)रोहिदास गाडगे

पुणे - खेड Khed तालुक्यातील खरपुडी गावात घडलेली हा थरार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. एक तरुण वेळीच मदतीला धावल्याने वृद्ध सुदैवाने बचावले आहेत. सैरावैरा धावणाऱ्या तरासाची अज्ञात वाहनाला धडक लागली आणि त्यात तरसाचा मृत्यू Death झाला.तरसाच्या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. 

काल ही घटना घडली असून हा संपूर्ण थरार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक वृद्ध रस्त्यावरून पायी निघालेले दिसत आहेत. तेंव्हा लगतच्या झुडपातून अचानकपणे तरस बाहेर आला. पुढे पायी निघालेल्या वृध्दाचा हात त्याने अक्षरशः जबड्यात धरला. गावातील तरुण हातात काठ्या घेऊन याच तरसाच्या शोधात होते.

तरसाचा दोघांवर हल्ला, थरार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद (पहा व्हिडिओ)
Anil Deshmukh यांना लूकआऊट नोटीस जारी, वाचा सविस्तर

सुदैवाने एक तरुण तिथंच तरसाचा शोध घेत होता. त्या तरुणाने तरसाला हुसकावून लावण्यासाठी काठीने प्रहार केला. काही वेळाने तरस धावला पण त्याने वृद्धाला गंभीर जखमी केले होते. तिथंच असणाऱ्या एकाच्या मोबाईल कॅमेऱ्यात हा सर्व थरार कैद झाला आहे. तसेच या तरसाने दुचाकीवरील आणखी एका व्यक्तीला चावा घेतला. नंतर एका अज्ञात वाहनाच्या धडकेत तरसाच्या तोंडाला जबर मार लागला आणि जखमी अवस्थेतील तरसाचा नंतर मृत्यू झाला. अशी माहिती खेड वनविभागाने दिली.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com