Fire : पवईच्या साकी विहार रोडवर ह्युंदाईच्या सर्व्हिस सेंटरला भीषण आग...(पहा व्हिडिओ)

पवई एल ॲण्ड टी गेट नंबर ६ समोरील ह्युंदाई सर्व्हिस सेंटर कंपनीला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Fire : पवईच्या साकी विहार रोडवर ह्युंदाईच्या सर्व्हिस सेंटरला भीषण आग...(पहा व्हिडिओ)
Fire : पवईच्या साकी विहार रोडवर ह्युंदाईच्या सर्व्हिस सेंटरला भीषण आग...(पहा व्हिडिओ)Saam Tv

सुशांत सावंत

मुंबई : पवई एल ॲण्ड टी गेट नंबर ६ समोरील ह्युंदाई सर्व्हिस सेंटर कंपनीला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण आगीत कर्मचारी अडकल्याची माहीती मिळत असून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न अग्निशमन दलाचे जवान करत आहेत. गँस सिलेंडरचा स्फोट होवून आग लागल्याचे कर्मचारी सांगत असून आग लागली आहे. तेव्हा मोठा प्रमाणात आवाज या ठिकाणी येत आहेत. दरम्यान आग ही पसरत असून आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहे.

पवईतील साकी विहार रोडवर एल अँड टी कंपनीच्या समोर साई ऑटो हुंडाईचं सर्व्हिस सेंटर आहे. या सेंटरला भीषण आग लागली आहे. आगीचे लोट मोठ्या प्रमाणात पसरल्याने सर्व्हिस सेंटर शेजारच्या महावीर क्लासिक या इमारतीत राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पवई पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि वाहतूक विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीमुळे आणि नागरिकांच्या प्रचंड गर्दीमुळे वाहतूक कोंडी होऊन मदत कार्याला उशीर होत आहे. सर्व्हिस सेंटर मोठमोठ्या स्फोटांचे आवाज होत आहेत. या आगीमध्ये कोट्यवधींचे गाड्या असून त्या जळून खाक झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com