पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावुक म्हणाले, पहिल्यांदाच दीदी रक्षाबंधनाला नसणार

लता मंगेशकर यांनी भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीपासून देशाला स्वर दिला, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.
Narendra Modi
Narendra ModiSaam Tv

मुंबई: : मुंबईतील माटुंगा येथील षण्मुखानंद नाट्यगृहात आज सायंकाळी मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात पहिला लता मंगेशकर पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी लता मंगेशकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. मी हा पुरस्कार सर्व देशवासियांना समर्पित करत आहे. हा पुरस्कार जनतेचा आहे. माणूस आपल्या वयाने नाहीतर आपल्या कार्याने मोठा असतो, अस लतादीदी कायम म्हणायच्या असंही नरेंद्र मोदी म्हणाले. दीदींनी संगीतात अस स्थान निर्माण केलं की त्यांना त्या क्षेत्रातील सरस्वती मानतं होते. सिनेमातील चार पाच पिढ्यांना त्यांनी आवाज दिला आहे. विश्व त्यांना स्वरसाम्राज्ञी मानतं होते, असंही मोदी म्हणाले.

लतादीदींना आपण पाहिले हे आपले भाग्य आहे. दीदींनी संगीत जगतावर छाप सोडली. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या अगोदरपासून देशाला स्वर दिला, असंही मोदी म्हणाले. यावेळी बोलताना नरेंद्र मोदी (Narendra Modi) भावुक झाले, पहिल्यांदाच असं होईल रक्षाबंधनाला लतादीदी नसतील.

Narendra Modi
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल

या पुरस्कार सोहळ्याला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उद्योगमंत्री सुभाष देसाई, मंत्री आदित्य ठाकरे , विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पहिला लता मंगेशकर पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रदान

मुंबईतील माटुंगा येथील षण्मुखानंद नाट्यगृहात आज सायंकाळी मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात पहिला लता मंगेशकर पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पहिला लता मंगेशकर पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना देण्यात आला. या सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी आज रविवारी मुंबईत दाखल झाले.

११ एप्रिल रोजी या पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पीएम मोदींच्या नावाने पहिला पुरस्कार जाहीर करण्यात आला. ज्यांनी आपल्या देशासाठी, तेथील लोकांसाठी आणि आपल्या समाजासाठी एक अग्रगण्य, तेजस्वी आणि अनुकरणीय योगदान दिले आहे, अशा व्यक्तींना दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येणार असल्याचे ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले.

Edited By- Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com