
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा आज MMRDA मैदान, BKC, वांद्रे पूर्व येथे 'मास्टर सभा' पार पडत आहे. या जाहीर सभेसाठी राज्यभरातून शिवसैनिकांनी तुफान गर्दी केली आहे. शिवसेनेचे राज्यभरातील नेते या सभेसाठी उपस्थित राहिले आहेत. यावेळी बोलताना युवासेना प्रमुख तथा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करताना आदित्य ठाकरे म्हणाले, "या सभेसाठी उपस्थित राहताना शिवसैनिकांची जी तुफान गर्दी मी पाहिली, इथे आल्यानंतर शिवसैनिकांची गर्दी पाहून व नतमस्तक होताना मला ह्या सर्व जनतेमध्ये पंचमुखी हनुमान दिसले. मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम, सीता लक्ष्मण दिसले, महादेव आणि विघ्नहर्ता गणपती दिसले."
पुढे बोलताना आदित्य ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेची पार्श्वभूमी मांडताना सांगितले कि, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेनेच्या सर्वच प्रमुख नेत्यांनी राज्यभरात ५००० किमीचा प्रवास करून जनमानस समजून घेण्याचा प्रयत्न केला. या राज्य दौऱयात जनतेमधून जी निवेदने शिवसेनेला मिळाली त्यातूनच महाविकास आघाडी सरकारची बीजे रोवली गेल्याचे आदित्य यांनी सांगितले.
महविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर, प्रत्येक जिल्ह्यात शिवसेनेचे नेते फिरत होते. वेगवेगळ्या विभागात जात होते. तेथील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वच नेत्यांनी प्रयत्न केले. मात्र, शिवसेनेचे नेते स्वतःचे कौतुक कधीच करत नाहीत. कोव्हिडच्या काळात राज्य सरकारने जे उत्तम काम केले त्याचे कौतुक केवळ देशानेच नव्हे तर जगानेही केले. असे आदित्य ठाकरे म्हणाले. केंद्राने कोरोना काळात देशभरात तातडीने लॉकडाऊन जाहीर केले. मात्र, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने सर्व जनतेचा विचार करून टप्याटप्याने लॉकडाऊन जाहीर केले.
लॉकडाऊन काळात जेव्हा जेव्हा मुख्यमंत्र्यांनी लाइव्हद्वारे येऊन नागरिकांशी संवाद साधला. या काळात लोकांना कधीही असे वाटले नाही कि मुख्यमंत्र्यांनी येऊन राज्याला दम दिला. उलट आपल्याच घरातील कोणीतरी वडीलधारी माणूस आपल्याला कोरोना काळात काळजी कशी घ्यावी हे सांगत असल्याची भावना राज्यातील नागरिकांची होती. यालाच राज्याचा प्रमुख आणि मुख्यमंत्री म्हणतात, असे मत आदित्य ठाकरेंनी व्यक्त केले.
उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री आहेत. मात्र, १९९९ नंतर कधी न कधी शिवसैनिक राज्याच्या प्रमुखपदी असेल, मुख्यमंत्री असेल असे स्वप्न आपण सर्वांनी पाहिले होते. जेव्हा महाराष्ट्रासह जगावर कोरोनाचे संकट आले तेव्हा जागतिक आरोग्य संघटनेला देखील जगाला धारावी पॅटर्न काय आहे हे दाखवण्याचे काम आपल्या मुख्यमंत्र्यांनी केले. असे आदित्य ठाकरे म्हणाले.
Edited By : Krushnarav Sathe
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.