"...त्यावेळी मी सहा वर्षांचा होतो" बाबासाहेब पुरंदरेंबद्दल राज ठाकरेंची एक आठवण

१४ ऑगस्ट २०२१ ला पुण्यातील एका कार्यक्रमात राज ठाकरेंनी बाबासाहेब पुरंदरेंशी झालेल्या पहिल्या भेटीच्या आठवणीला उजाळा दिला होता.
"...त्यावेळी मी सहा वर्षांचा होतो" बाबासाहेब पुरंदरेंबद्दल राज ठाकरेंची एक आठवण
"...त्यावेळी मी सहा वर्षांचा होतो" बाबासाहेब पुरंदरेंबद्दल राज ठाकरेंची एक आठवणSaam TV

पुणे: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंवर (Babasaheb Purandare) मागील आठवड्यापासून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपाचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. (Babasaheb Purandare Passed Away) सोमवारी पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यानंतर महाराष्ट्रभरातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MSS Cheif Raj Thackeray) यांनी देखील बाबासाहेब पुरंदरेंच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं. राज ठाकरे आणि बाबासाहेब पुरंदरेंच नातं काहीसं खास होतं. राज ठाकरे बाबासाहेब पुरंदरेंनी पित्यासमान मानत होते. १४ ऑगस्ट २०२१ ला पुण्यातील शिवसृष्टीमध्ये पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित ओजंळ पुस्तकाचे प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज ठाकरेंनी बाबासाहेबांशी झालेल्या पहिल्या भेटीच्या आठवणील उजाळा दिला होता. ("... I was six years old at that time" A memory of Raj Thackeray about Babasaheb Purandare)

हे देखील पहा -

यावेळी राज ठाकरे म्हणाले होते की, "आज बऱ्याच वर्षांनी मी शिवसृष्टीत आलो, इथे दाखल होत असताना मला जुनी शिवसृष्टी आठवली जी बाबासाहेबांनी शिवाजी पार्कवर शिवतीर्थावर साकारली होती, १९७४ मध्ये त्यावेळी मी सहा वर्षांचा होतो. मी रोज त्या शिवसृष्टीत जात असे आणि संध्याकाळचा राज्यभिषेक सोहळा मी पाहत होतो. पहिल्यांदा त्या शिवसृष्टीत भवानी तलावर आणली गेली होती आणि बाबासाहेब ती घेऊन आले होते. त्या भवानी तलावरीचं स्वागत बाळासाहेबांनी त्या वेशीवर केलं होतं, तेव्ही मी देखील तिथे होतो. त्यावेळी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात मी बाबासाहेब पुरंदरे या व्यक्तीला पाहिलं आणि तेव्हापासून आजपर्यंत माझं भाग्य की मी त्यांना भेटू शकलो, त्यांच्या सहवसात राहू शकलो. अनेक गोष्टी शिकू शकलो. त्यावेळी एकदा शिवाजी महाराजांच्या भूमिकेत स्वतः बाबाहेबांनी काम केलं होतं आणि ते मी पाहिलं आहे.” अशी आठवण राज ठाकरेंनी सांगितली होती.

जेव्हा राज ठाकरेंनी बाबासाहेब पुरंदरेंच्या पायावर डोकं ठेवलं...

राज ठाकरे हे बाबासाहेब पुरंदरे यांना एक इतिहासकार, शिवशाहीर यांच्याही पलिकडे एक मार्गदर्शक म्हणून मानत. जेव्हा २९ जुलै २०२१ रोजी बाबासाहेब पुरंदरेंनी वयाची ९९ वर्षे पुर्ण करत १०० व्या वर्षात पदार्पण केलं होतं. त्यावेळी राज ठाकरेंनी बाबासाहेब पुरंदरेंच्या पायावर डोकं टेकवत त्यांचे आशीर्वाद घेतले होते. यावरुन बाबासाहेब पुरंदरे आणि राज ठाकरे यांचं अनोखं नातं पहायला मिळतं.

"...त्यावेळी मी सहा वर्षांचा होतो" बाबासाहेब पुरंदरेंबद्दल राज ठाकरेंची एक आठवण
"...त्यावेळी मी सहा वर्षांचा होतो" बाबासाहेब पुरंदरेंबद्दल राज ठाकरेंची एक आठवणSaam TV

बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाच्या वृत्ताने राज ठाकरे भावूक झाले. त्यांनी एका प्रसिद्धापत्रकातून आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, "बाबासाहेबांनी आपलं आयुष्य शिवचरित्र सांगण्यासाठी खर्च केलं. परंतु असं असतानाही वर्तमानातील प्रश्न आणि भविष्यातील आव्हानं ह्याबाबत त्यांच्याकडून कायम मार्गदर्शन होत आलं. माझ्या व्यक्तिगत आयुष्यात ते माझे मार्गदर्शक तर होतेच, परंतु मला पितृतुल्यही होते. बाबासाहेब मला नेहमी सांगत, "महाराजांचा जिथे जिथे पदस्पर्श झाला, तिथे तिथे मी आजपर्यंत अनेकदा जाऊन आलो आहे. आता फक्त एकच जागा उरली आहे, महाराज जिथे गेलेत तिथे जायची!" अशी आठवण राज ठाकरेंनी सांगितली आहे.

"...त्यावेळी मी सहा वर्षांचा होतो" बाबासाहेब पुरंदरेंबद्दल राज ठाकरेंची एक आठवण
आठवण बाबासाहेबांची; त्यावेळी टीका टिप्पणी झाली हाेती : रामराजे

शिवछत्रपती महाराजांचा सेवक आज साक्षात छत्रपतींची सेवा करण्यासाठी निघाला...इतिहास संशोधक, शिवचरित्रकार, महाराष्ट्र भूषण सन्माननीय बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विनम्र श्रद्धांजली! दरम्यान बाबासाहेब पुरंदरेंवर पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

Edited By -Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com