बाबासाहेबांना मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही - नितीन गडकरी (Video)

त्यांनी जी माहिती आणि इतिहास सांगितला त्यातूनच व्यक्तिमत्व घडलं.
बाबासाहेबांना मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही - नितीन गडकरी (Video)
बाबासाहेबांना मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही - नितीन गडकरीSaamTV

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन झाले आहे. बाबासाहेब पुरंदरे काही दिवसांपूर्वी घरात पडले होते त्यांच्या डोक्याला मार लागला होता, त्यानंतर दिनानाथ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं, तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. आज सकाळी ५.०७ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान यावर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ट्विट करत नितीन गडकरी यांनी श्रद्धेय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी ते म्हणले की, बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यात खऱ्या अर्थाने शिवचरित्र आणि शिवरायांचं महत्व त्यावेळच्या विद्यार्थ्यांना आणि तरुण पिढीला समजावून सांगितलं. त्यातून राष्ट्रभक्तीची भावना निर्माण झाली.

बाबासाहेबांना मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही - नितीन गडकरी
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे काळाच्या पडद्याआड; पुण्यात निधन

पुढे ते म्हणले की, माझ्या सारख्या अनेक तरुणांना त्या काळात ही प्रेरणा बाळासाहेबांनी दिली आणि त्यांचे जे संस्कार होते, त्यांनी जी माहिती आणि इतिहास सांगितला त्यातूनच व्यक्तिमत्व घडलं. त्या बाबासाहेबांना मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही कारण शिवाजी महाराजांचं यथार्थ जीवन त्यांनी प्रभावीपणे समजावून सांगितलं. मी त्यांना कधीच विसरू शकत नाही एवढं मोठं त्यांचं कार्य आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना गडकरी यांनी यावेळी केली.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com