Gateway To Mandwa Ferry Service: अलिबागसाठी वीकेंड प्लान करत असाल तर थांबा, गेटवे- मांडवा सागरी वाहतूक 3 महिन्यांसाठी बंद

Planning Weekend For Alibaug: गेटवे ते मांडवा सागरी वाहतूक (Gateway To Mandwa Ferry Service) तब्बल 3 महिन्यांसाठी बंद करण्यात आली आहे.
Gateway To Mandwa Ferry Service
Gateway To Mandwa Ferry ServiceSaam TV

Mumbai News: मुंबईवरुन मांडवा अथवा अलिबागला (Alibaug) फिरायला जाण्यासाठी प्लान करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण आता अलिबागला जाण्यासाठी तुम्हाला समुद्रा मार्गे प्रवास करता येणार नाही. यासाठी तुम्हाला पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. यामागचे कारण म्हणजे गेटवे ते मांडवा सागरी वाहतूक (Gateway To Mandwa Ferry Service) तब्बल 3 महिन्यांसाठी बंद करण्यात आली आहे.

Gateway To Mandwa Ferry Service
Samruddhi Mahamarg : 'समृद्धी'च्या दुसऱ्या टप्प्याचं आज लोकार्पण; अनेक मागण्यासांठी शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात

मुंबईच्या नजीकचे पर्यटनस्थळ म्हणून अलिबागकडे पाहिले जाते. अगदी एका तासामध्ये तुम्ही समुद्रा मार्गे प्रवास करुन अलिबागमध्ये पोहचू शकता. त्यामुळे या प्रवासाला प्रत्येक जण जास्त प्राधान्य देतात. रस्ते मार्गावरुन तीन ते साडेतीन तासांचा प्रवास करण्यापेक्षा मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया आणि भाऊचा धक्का इथून बोटीने म्हणजेच फेरीने प्रवास करत अलिबाग गाठता येते. त्यामुळे वेळ देखील वाचतो आणि मजा-मस्ती देखील करण्यास जास्त वेळ मिळतो. तसंच या मार्गे प्रवास करण्याची देखील मजा घेता येते. त्यामुळे पर्यटकांची पहिली पसंती या प्रवासाला असते.

Gateway To Mandwa Ferry Service
Political News : लोकसभेसाठी अनेक जागांची अदलाबदल होण्याची शक्यता; श्रीकांत शिंदेंना देखील हक्काचा मतदारसंघ सोडावा लागणार?

पण आता मांडवा ते गेट वे या मार्गावर सुरु असणारी जल वाहतूक 26 मे ते 31 ऑगस्ट या कालावाधीमध्ये बंद राहणार आहे. तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ ही वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. मेरी टाईम विभागाकडून जलवाहतूक करणाऱ्या विभागांना यासंदर्भातील सूचना पत्राद्वारे देण्यात आल्या आहेत. भाऊच्या धक्क्यावरून M2M रो-रो फेरी सेवा मात्र सुरु राहणार आहे. त्यामुळे अलिबागला जाणाऱ्यांसाठी ही एक दिलासादायक बाब आहे.

गेट वे ते मांडवा याठिकाणी जाण्यासाठी असणाऱ्या सर्वच फेरी सेवा बंद असणार आहेत. मालदार, अजंठा, पीएनपी आणि अपोलो या जलवाहतूक करणाऱ्या कंपन्यांची सेवाही बंद राहण्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुंबईवरुन अलिबागला जाणारे पर्यटक नाराज झाले आहेत. अशामध्ये रो-रो सेवा सुरु राहणार असल्यामुळे या पर्यटकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पण इतर फेरींपेक्षा रो-रो फेरीसाठी या पर्यटकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहे. नाहीतर त्यांना रस्ते मार्गाने वाहतूक करुन अलिबाग गाठावे लागणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com