Pune : कोरोनावरती नियंत्रण मिळवलं तर मिळणार, तब्बल 50 लाखांचं बक्षिस

कोरोनाच्या पहिल्या आणि दुस-या लाटेत ग्रामीण भागातील अनेक गावांनी कोरोनाला गावच्या वेशीवरती रोखलं होतं, हाच धागा पकडुन पुणे जिल्हा परिषदेने आता कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी तीन बक्षीस योजनेची घोषणा केली आहे.
Pune : कोरोनावरती नियंत्रण मिळवलं तर मिळणार, तब्बल 50 लाखांचं बक्षिस
Pune : कोरोनावरती नियंत्रण मिळवलं तर मिळणार, तब्बल 50 लाखांचं बक्षिसSaam TV

पुणे : कोरोनाच्या पहिल्या आणि दुस-या लाटेत ग्रामीण भागातील अनेक गावांनी कोरोनाला गावच्या वेशीवरती रोखलं होतं. तर काही गावांनी कोरोनाला हद्दपार केलं, हाच धागा पकडुन पुणे जिल्हा परिषदेने (Pune Zilla Parishad) आता कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी कोरोना मुक्त गावच्या विकास कामांसाठी तीन बक्षीस योजनेची घोषणा केली आहे. प्रथम क्रमांकाला 50 लाख,द्वितीय 25 लाख आणि तृतीय क्रमांकाला 15 लाखांचे बक्षीस जाहिर केल आहे.

Pune : कोरोनावरती नियंत्रण मिळवलं तर मिळणार, तब्बल 50 लाखांचं बक्षिस
Jalgaon Corona: सक्रिय रुग्णसंख्या हजारावर; तिसऱ्या लाटेतील पहिला बळी

पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यात कोरोना मुक्त गावांचा प्रयोग 15 जानेवारी ते 15 मार्च दरम्यान राबविला जाणार असुन यासाठी जिल्हा परिषदेने मार्गदर्शक सुचना जारी केली आहे. गावातील वाहन चालक स्वयंसेवक म्हणुन काम करतील तर एका गावात कोरोना तपासणीची (Corona Test) पाच पथके काम पहातील प्रत्येक पथक गाव वस्तीनुसार कुटुंब सर्वेक्षण करेल कुटुंबातील वयोवृद्ध,गरोदर माता,लहीन मुलांनी काळजी कशी घ्यावी यासाठी मार्गदर्शन करणार आणि गावपातळीवरतीच विलीगिकरण कक्ष तयार करण्यात येणार आहे.

कोरोनाच्या तिस-या लाटेत (Third Wave) लक्षणे विरहित रुग्ण संख्या जास्त असल्याचे दिसुन येत असताना यातुन कोरोनाचा समुह संसर्ग रोखण्यासाठी गावपातळीवरुनच उपाय योजना करण्याची गरज असल्याने कोरोना मुक्त बक्षीस योजना सुरु करण्यात आली असल्याचं मुख्य कार्यकारी आधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितलं.

हे देखील पहा -

तसंच गाव पातळीवर राजकारण आणि श्रेयवादाची किनार असतेच त्यावरही मात करुन समाजातील प्रत्येक घटलाला कोरोना पासुन रोखण्यासाठी गावपातळीवरील गट तटाचे राजकारण बाजुला ठेवुन एकजुटीने सामाजिक कार्यात हातभार लावण्याचे गरज आहे. पहिल्या दुस-या लाटेत अनेक गावांनी कोरोनाला (Corona) हद्दपार केलं त्याच धर्तीवर तिस-या लाटेचा सामना करत असताना गावपातळीवर सामाजिक बांधिलकी जपत गाव स्वच्छता आणि विलगीकरणाची मोहिम,लसीकरण हाती घेऊन गावपातळीवर यशस्वी काम करण्याची गरज असल्याचं गावचे सरपंच आणि ग्रामस्थही सांगत आहेत.

कोरोना मुक्तीसाठी पुणे (Pune) जिल्हा परिषदेने सुरु केलेली हि योजना गावपुढा-यांना बळ देणारी आहे फक्त यात राजकारण न करता योग्य दिशेने काम करण्याची गरज आहे तर कोरोनाला गावच्या वेशीबाहेर रोखण्यासाठी यश मिळेल.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com