Video | महिलांच्या शौचालयात डोकावून पाहणाऱ्याला अटक; IIT Bombay मधील धक्कादायक प्रकार

पोलिसांनी महिलांच्या शौचालयात डोकावणाऱ्यास पवई (Powai) पोलिसांनी अटक केली आहे.
mumbai crime news
mumbai crime news saam tv

सूरज सावंत

Mumbai Crime News : मुंबईच्या पवईतून संतापजनक प्रकार समोर आला आहे. आयआयटी बॉम्बेमधील शौचालयाच्या खिडकीतून आरोपी डोकावत असल्याची घटना घडली आहे. सदर घटनेनंतर आयआयटी बॉम्बेमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी महिलांच्या शौचालयात डोकावणाऱ्यास पवई (Powai) पोलिसांनी अटक केली आहे.

mumbai crime news
Mumbai : निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीने संपविले जीवन; हत्या की आत्महत्या ?

मिळालेल्या महितीनुसार, पवईच्या आयआयटी बॉम्बेची एक विद्यार्थिनी शौचालयात असताना खिडकीतून आरोपी डोकावत असल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री सदर घटना उघडकीस आली आहे. या घटनेने आयआयटी बॉम्बे एकच खळबळ उडाली आहे. सदर प्रकारानंतर आयआयटी बॉम्बेमधील विद्यार्थीनीने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आयआयटी बॉम्बेच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पिंटू गरिया नामक या आरोपी व्यक्तीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

पिंटू गरिया असे कॅन्टीनमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. अटक करण्यात आलेला व्यक्ती कॅन्टीनमध्ये काम करणारा कर्मचारी आहे. आरोपी पिंटू गरियावर गुन्हा नोंदवून त्याला गुन्हा नोंदवून त्याला अटक केल्याची माहिती झोन १०चे डीसीपी महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

mumbai crime news
Pune : कर्ज फेडण्यासाठी लोन अ‍ॅपकडून दबाव; पुण्यात तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

मुलींचे व्हिडिओ लीक प्रकरणी दोघांना अटक; पोलिसांची कारवाई

दरम्यान, काही दिवसांपूर्वी चंदीगढ विद्यापीठाच्या (Chandigarh University) मोहाली येथील मुलींच्या वसतीगृहातील सुमारे ६० मुलींचा आंघोळ करतानाचे व्हिडिओ (Viral Video) इंटरनेटवर व्हायरल झाल्याचा प्रकार घडला होता. धक्कादायक बाब म्हणजे या मुलीचे व्हिडिओ बनवणारी व्यक्ती दुसरी-तिसरी कुणी नसून त्यांच्याच हॉस्टेलमध्ये राहणारी एक विद्यार्थिनी होती. सदर विद्यार्थिनी तिच्या मित्राला व्हिडिओ पाठवायची. या प्रकरणी पोलिसांनी (Police)दोघांना अटक केली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com