मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; ७ आणि ८ जून रोजी 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद

मुंबईत जलवाहिनी जोडकामासाठी मंगळवारी ७ जून रोजी सकाळी १० वाजेपासून ८ जून रोजी सकाळी १० वाजेपर्यंत २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे.
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; ७ आणि ८ जून रोजी  'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद
water supply Saam Tv

मुंबई : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे. मुंबईत जलवाहिनी जोडकामासाठी मंगळवारी ७ जून रोजी सकाळी १० वाजेपासून ८ जून रोजी सकाळी १० वाजेपर्यंत २४ तासांसाठी पाणीपुरवठा (Water Supply) बंद करण्यात येणार आहे. सदर कामामुळे एफ/दक्षिण विभागांमधील ए, बी, ई विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे पाणीकपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा, असे आवाहन मुंबई महापालिकेच्या (BMC) प्रशासनाने सदर नागरिकांना केले आहे. ( Mumbai water supply news In Marathi )

हे देखील पाहा -

मुंबई महानगरपालिकेतर्फे एफ/दक्षिण विभागातील पाणीपुरवठा सुव्यवस्थित करण्याकरिता शिवडी बस डेपोसमोर ७५० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवर जोड असलेली ६०० मिलीमीटर आणि ४५० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनीची १५०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवर जोड देण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी मंगळवारी सकाळी १० वाजेपासून बुधवारी सकाळी १० वाजेपर्यंत एकूण २४ तासांसाठी जलवाहिनी जोडण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

त्यामुळं सदर कालावधीत महानगरपालिकेच्या एफ/दक्षिण विभागातील रुग्णालय प्रभाग, शिवडी (पूर्व व पश्चिम), परळ गांव, काळेवाडी, नायगांव, शिवडी, वडाळा, अभ्युदय नगर तसेच ए, बी, आणि ई विभागातील काही परिसरांमध्ये देखील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. तर शहर उत्तर व दक्षिण परिसर पाणीपुरवठा विभागातील काही परिसरांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

water supply
पाणीप्रश्नावरुन अजित पवारांच्या टीकेला प्रणिती शिंदेंचं उत्तर; भाजपवरही साधला निशाणा

उपरोक्त नमूद कालावधीत पाणीकपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com