16 ते 20 ऑक्टोबर दरम्यान रात्रीच्या वेळी अवजड वाहनांना कल्याण-शीळ रोडवर नो एंट्री!

लोढा–पलावा जंक्शन येथील देसाई खाडीवर नवीन पुल निर्माण करण्याचे काम चालू आहे. त्याचाच भाग म्हणून कल्याण फाट्याकडून डोंबिवली आणि कल्याण कडे जाणाऱ्या रस्त्यावर पलावा जंक्शन येथे मोठे क्रेन ठेवून सिमेंट गर्डर ठेवण्याचे काम करण्यात येणार आहे.
16 ते 20 ऑक्टोबर दरम्यान रात्रीच्या वेळी अवजड वाहनांना कल्याण-शीळ रोडवर नो एंट्री!
16 ते 20 ऑक्टोबर दरम्यान रात्रीच्या वेळी अवजड वाहनांना कल्याण-शीळ रोडवर नो एंट्री!प्रदीप भणगे

डोंबिवली : लोढा–पलावा जंक्शन येथील देसाई खाडीवर नवीन पुल निर्माण करण्याचे काम चालू आहे. त्याचाच भाग म्हणून कल्याण फाट्याकडून डोंबिवली आणि कल्याण कडे जाणाऱ्या रस्त्यावर पलावा जंक्शन येथे मोठे क्रेन ठेवून सिमेंट गर्डर ठेवण्याचे काम करण्यात येणार आहे.

हे देखील पहा :

सदरचे काम दि. १६/१०/२०२१ ते दि.२०/१०/२०२१ रात्री 10 ते सकाळी 6 वा. वाजे पर्यंत करण्यात येणार आहे. त्यामुळे कल्याण फाट्याकडून कल्याण कडे जाणाऱ्या अवजड वाहनांना कल्याण फाटा येथे प्रवेश बंद करण्यात आला असुन सदरची वाहने ही कल्याण फाटा- मुंब्रा बायपास-खारेगाव टोल नाका मार्गे इच्छित स्थळी जातील.

16 ते 20 ऑक्टोबर दरम्यान रात्रीच्या वेळी अवजड वाहनांना कल्याण-शीळ रोडवर नो एंट्री!
Nandurbar : जिल्हा परिषदेतील स्थायी समितीत खडाजंगी!

कल्याण कडून कल्याण फाट्याकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना बदलापुर चौक येथे प्रवेश बंद करण्यात आला असुन सदरची वाहने बदलापुर चौक-खोणी नाका-तळोजा एम.आय.डी.सी. मार्गे इच्छित स्थळी जातील अशी सूचना वाहतूक विभागाने काढली आहे. सदर अधिसुचना हलक्या वाहनांना ( Light Vehical ) लागू नसल्याचे वाहतूक विभागातर्फे सांगण्यात आले.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.