कामावर गेले ते परतलेच नाहीत, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

डफळे यांनी एका झाडाला गळफास घेतला होता. त्यांचा मृतदेह कुजल्यानं तो झाडावरून खाली पडला.
कामावर गेले ते परतलेच नाहीत, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह
Ambernathअजय दुधाने

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये (Ambernath) एका ५९ वर्षीय इसमाने झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे. अंबरनाथ पूर्वेतील लोकनगरी बायपास रस्त्यालगत ही घटना घडली आहे. हैबत रामचंद्र डफळे असं आत्महत्या केलेल्या ५९ वर्षीय इसमाचं नाव असून ते आयटीआय कॉलनी परिसरात वास्तव्याला होते.

वसईच्या एका कंपनीत डफळे हे काम करत होते. मागील बुधवारी ४ मे रोजी ते कामावर गेले होते. मात्र तेव्हापासून ते घरी परतलेच नव्हते. त्यामुळं त्यांच्या कुटुंबीयांनी वसईच्या पोलीस ठाण्यात ते हरवले असल्याची तक्रार दाखल केली होती. आज लोकनगरी बायपास रस्त्यालगतच्या झुडपात एक कुजलेल्या अवस्थेतला स्थानिकांना आढळून आला. या मृतदेहाशेजारी एक बॅग आढळून आली, ज्यात आढळलेल्या ओळखपत्रांवरून हा मृतदेह बेपत्ता असलेल्या हैबत रामचंद्र डफळे यांचाच असल्याचं निष्पन्न झालं.

Ambernath
अनिल परब राष्ट्रवादीला कामं देतात, शिवसेनेच्या लोकांना डावलतात; सेना पदाधिकाऱ्यांचा आरोप

डफळे यांनी एका झाडाला गळफास घेतला होता. मात्र त्यांचा मृतदेह कुजल्यानं तो झाडावरून खाली पडला. याबाबतची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत डफळे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. हैबत डफळे यांनी आत्महत्या का केली? हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. याप्रकरणी पोलिसांकडून आकस्मात मृत्यूची नोंद करत पुढील तपास सुरू असल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस (Shivajinagar Police) ठाण्याचे (Thane) वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भोगे यांनी दिली आहे.

Edited By - Jagdish patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.