बदलापुरात चोरट्यांचा धुमाकुळ चोरी करुन वॉचमनला मारले दगडं; घटना कॅमेरात कैद

२५ जुलैला पहाटे ३ वाजता ५ चोरटे अंगावर चादरी घेऊन या सोसायटीत घुसले.
Badlapur Theft News
Badlapur Theft NewsSaam TV

बदलापूर: बदलापुरात (Badlapur) चोरट्यांचा रात्रीस खेळ सुरू असल्याचं समोर आलं आहे. शिवाय या चोरट्यांनी फक्त चोरीच केली नाही तर चोरी केल्यानंतर वॉचमनला दगडं मारल्याचा प्रकार समोर आला आहे.

सदर घटना कात्रप परिसरात एका सोसायटीत घडली असून चोरट्यांनी वॉचमनला दगडं मारत तिथून पळ काढल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. बदलापूर पूर्वेच्या कात्रप परिसरात शुभ निसर्ग नावाची सोसायटी आहे. २५ जुलैला पहाटे ३ वाजता ५ चोरटे अंगावर चादरी घेऊन या सोसायटीत घुसले.

Badlapur Theft News
दारुच्या नशेत कार चालकाची २ दुचाकीस्वारांना धडक, सिंहगड रस्त्यावरील घटना

त्यांनी ई विंगमध्ये तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या हिमांशू उदेशी यांच्या घराचा कडी कोयंडा उचकटून त्यांच्या घरात प्रवेश केला. तिथे त्यांनी २ सोन्याच्या चेन, ४ कानातले, ४ चांदीचे कडे, ६ लॉकेट, २ ब्रेसलेट, पैंजण, ५ चांदीचे शिक्के, चांदीचा पेला, ताटली असा मुद्देमाल चोरला.

पाहा व्हिडीओ -

यानंतर चोरटे तिथून पळून जात असतानाच वॉचमनला त्यांची चाहूल लागली असता वॉचमनने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला मात्र, चोरट्यांनी वॉचमनच्या अंगावरवरच दगडं मारत तिथून पळ काढला. चोरट्यांचा हा सगळा प्रकार सोसायटीच्या CCTV कॅमेरात कैद झाला असून याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून (Police) चोरट्यांचा कसून शोध घेतला जातोय.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com