शिंदे गटातील आमदार मातोश्रीच्या संपर्कात? ही असू शकतात कारणं...

काल झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर अनेक आमदार नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
chief minister Eknath Shinde Group
chief minister Eknath Shinde GroupSaam TV

मुंबई: अनेक धक्कादायक घडामोडीनंतर राज्यात सत्तेवर आलेल्या शिंदे सरकारने काल (मंगळवार ९ ऑगस्ट) मंत्रिमंडळाचा विस्तार केला. शिंदे गटाचे ९ आणि भाजपचे ९ अशा एकून १८ आमदारांनी काल मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. (Expansion of Cabinet)

मात्र, या मंत्रिमंडळ विस्तारावरुन अनेक आमदार नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. शिवाय हे आमदार आता 'मातोश्री'च्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र, शिंदे गटातील हे आमदार का नाराज आहेत याबाबतची काही कारणं सुत्रांकडून समोर आली आहेत.

एकनाथ शिंदे गटातील आमदारांच्या नाराजीची कारणे पुढीलप्रमाणे -

मंत्रिमंडळ विस्तार एकाच टप्प्यात -

राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार एकाच टप्प्यात करावा अशी मागणी एकनाथ शिंदे गटातील आमदारांची होती. मात्र, तसे न होता आता दोन टप्प्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात इतरांचा नंबर लागताच काहीजण नाराज झाल्याचं बोललं जात आहे.

एकनाथ शिंदेंसोबत (Eknath Shinde) पहिल्यांदा गेलेल्या आमदारांना वगळून नंतर गेलेल्या आमदारांना मंत्री पद देण्यात आल्यामुळे देखील काही आमदार नाराज आहेत. तर काल याच मुद्द्यावरुन अपक्ष आमदार बच्चू कडू (bachchu Kadu) यांनी देखील आपली नाराजी व्यक्त केली होती.

मागून आलेले पुढे -

काल साम टीव्हीशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, 'मंत्रिमंडळ विस्तारात एकनाथ शिंदे गटासोबत गेलेल्या अपक्ष आमदारांना मंत्री पद मिळणे अपेक्षित होते. आम्ही अडचणी समजू शकतो. जे आमदार सोबत गेले त्यांची नाराजी तर असणारच. जे एकनाथ शिंदे गटासोबत पहिले गेले ते मागे राहिले आणि मागून आलेले पुढे गेले.' त्यामुळे आमदारांच्या नाराजीचं हे एक प्रमुख कारण असल्याचं समोर आलं आहे.

भाजप सोबत जायची भूमिका -

chief minister Eknath Shinde Group
'शिंदे गटासोबत पहिले गेलेले मागे राहिले अन्...'; मंत्रीमंडळ विस्तारावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया

शिवाय गट तयार करून भाजप सोबत जायचे ही भूमिका असतांना शिवसेना पक्ष,चिन्ह काबीज करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे तो शिंदे गटातील काही आमदारांना आवडला नसल्याचं सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. शिवाय मंत्रिमंडळ विस्तारात आवडीची खाती मिळणार नाहीत हे लक्षात येताच शिंदे गटात नाराजीचा सूर पसरू लागल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com