रहदारीचा रस्ता अचानक खचला, विटांसह ट्रक जमिनीत रुतला; पाहा Video

अनेक वर्षापासून या भागातील रस्त्यांची देखभाल करण्यात आलेली नाही. त्यामुळे हा रस्ता निकृष्ट झाला असल्याचे स्थानिक दुकानदारांचे मत आहे.
रहदारीचा रस्ता अचानक खचला, विटांसह ट्रक जमिनीत रुतला; पाहा Video
The Truck Stuck Into The Groundप्रदीप भणगे

डोंबिवली : डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकासमोरील रहदारीच्या पाटकर पथ या रस्त्यावरुन विटांनी भरलेला ट्रक जात असताना रस्ता अचानक खचला आणि विटांसह ट्रकचा मागील भाग टायरसहीत जमिनीत रूतल्याची घटना सकाळी ११.१५ च्या सुमारास घडली आहे. सदर घटना घडताच या भागात काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती.

दरम्यान, दुपारी २.३० च्या सुमारास हा ट्रक (Truck) क्रेनच्या साहाय्याने काढण्यात आला आहे. ट्रक त्या जागेवरुन बाजूला केला असला तरी त्या ठिकाणी आता मोठा खड्डा पडला आहे. शिवाय या रस्त्यांखालून मोठा नाला आणि गटारे गेली आहेत आणि त्यावर रस्त्यांची बांधणी केल्याचे दिसून येतं आहे.

अनेक वर्षापासून या भागातील रस्त्यांची देखभाल करण्यात आलेली नाही. त्यामुळे हा रस्ता निकृष्ट झाला असल्याचे स्थानिक दुकानदारांचे मत आहे. तर मोठा पाऊस पडल्यानंतर दर पावसाळ्यात या रस्त्यावर गुडघाभर पाणी साचते. त्यामुळे पावसाळ्यात असे काही घडले असते मोठी दुर्घटना झाली असती. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी मोठी दुर्घटना टळल्याचं स्थानिक दुकानदार म्हणाले.

पाहा व्हिडीओ -

बुधवारी सकाळी विटांनी भरलेला एक ट्रक डोंबिवली (Dombivli) पूर्वेतून पश्चिमेला जात होता. ट्रक चालकाने चुकून गाडी भाजीमार्केट रोडवरून काढली. पाटकर पथ वरून इंदिरा चौकात जाण्यासाठी वळण घेत असताना वळणावरच रस्ता खचल्याने ट्रकचे पाठीमागील डाव्या बाजूचे चाक त्यात पूर्णपणे अडकले आणि ट्रक एका बाजूला कलला. सकाळच्या सुमारास ही घटना घडल्याने काही काळ ट्रॅफिक झाले होते.

वाहतूक पोलिसांना (Police) ही मिळताच त्यांनी रस्त्यावरील वाहतूक पूर्ण बंद केली. त्यानंतर दुसरा ट्रक बोलावून त्यात विटांचा माल खाली करण्यात आला आणि क्रेनच्या सहाय्याने ट्रकचे चाक बाहेर काढण्यात आले अशी माहिती ट्रकचे चालक ईश्वर प्रजापती यांनी दिली. ट्रक बाहेर काढल्यांनातर रस्ता खचलेल्या ठिकाणी बॅरिकेट्स लावत वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

तर सदर ठिकाणी आता मोठा खड्डा पडला आहे. या रस्त्यांखालून मोठा नाला आणि गटारे गेली आहेत आणि त्यावर रस्त्यांची बांधणी केल्याचे दिसून येते.दरम्यान अनेक वर्षापासून या भागातील रस्त्यांची देखभाल करण्यात आलेली नाही. त्यामुळे हा रस्ता निकृष्ट झाला आहे,असे स्थानिक दुकानदारांचे मत आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com