पतंगाचा मांजा ठरतोय जीवघेणा! मुंबईत बाईकस्वार थोडक्यात बचावला

संक्रांत जवळ आल्याने सध्या पतंग उडवण्याचा सण आहे. परंतु, महामार्गालगत पतंग उडवण्याची टी हाऊस बाइकस्वारांचा जीवावर बेतते.
नायलॉन मांजा
नायलॉन मांजाsaam tv

जयश्री मोरे

मुंबई: संक्रांत जवळ आल्याने सध्या पतंग उडवण्याचा सण आहे. परंतु, महामार्गालगत पतंग उडवण्याची टी हाऊस बाइकस्वारांचा जीवावर बेतते. विलेपार्ले येथील महामार्गावर याच पतंगाच्या मांजाने गळा चिरता राहिला आणि तरुणाच्या बोटांवर दुखापत होण्यात निभावले. देव बलवंत तर म्हणून स्वप्नील गायकर हा (29 वर्षाचा) तरुण बचावला.

नायलॉन मांजा
बारामती: अपघात झालेल्या कंटेनरमध्ये सापडला 22 लाखांचा गुटखा !

चुनाभट्टी येथे राहणारा स्वप्निल गायकर हा कांदिवली येथे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी मध्ये कामाला आहे. कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी स्वप्निल बाईक वापरत होते. बाईक वरून घरी परतत असताना सहार जंक्शनजवळ त्याच्या गळ्यात मांजा अडकल्याने सावधगिरीने बाईक थांबवत हाताने दूर करण्याचा प्रयत्न करत स्वतःचा बचाव केला.

या मांजामुळे गळ्यावर कापले होते आणि दोन्ही हाताच्या बोटांना ही कापले गेले. त्याच वेळी स्वप्नांच्या मागे त्याचा मित्र देखील बसला होता. त्याच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्याने स्वप्निलला एल रहेजा रुग्णालयात उचल उपचारासाठी नेले त्यामुळे तो बचावला. नायलॉनच्या मांजावर बंदी आणली असली तरी हा मांजा सर्रास वापरला जातो त्यामुळे अनेकांचा जीव धोक्यात येत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com