धक्कादायक! पिंपरी चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलांनी दुकान मालकांवरती केले कोयत्याने वार

दुकान मालकावरती कोयत्याने सपासप वार करून दुकानात मोठी तोडफोड केली आहे.
धक्कादायक! पिंपरी चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलांनी दुकान मालकांवरती केले कोयत्याने वार
धक्कादायक! पिंपरी चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलांनी दुकान मालकांवरती केले कोयत्याने वारSaamTV

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) एक धक्कादायक घटना समोर आली आहे हप्ता मागण्यांसाठी आलेल्या या अल्पवयीन मुलांनी रेडिमेड कपड्याच्या दुकान मालकावरती कोयत्याने सपासप वार करून दुकानात मोठी तोडफोड केली आहे. डीलक्स चौकातील मिस्टर मॅड या दुकानात ही घटना घडली आहे. (In Pimpri Chinchwad, minors attacked shop owners)

हे देखील पहा-

या घटनेची सर्व दृश्य सीसीटीव्ही CCTV कॅमेऱ्या मध्ये कैद झाली आहेत. दुकानात तोडफोड करणारी मुलं ही पिंपरी भागातीलच स्थानिक रहिवासी असून त्यांनी दुकान मालकाकडे हप्ता मागण्यासाठी कोयत्याने वार केले आहेत. घटनेचे गांभीर्य पाहता दुकान मालक इब्राहीम सलीम शेखच्या तक्रारीवरुन पिंपरी पोलिस स्टेशनमध्ये (Pimpri Police Station) तीन अल्पवयीन आरोपी मुलांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिनही अल्पवयीन मुलांना पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. मात्र एकूणच या घटनेने पिंपरी-चिंचवडच्या व्यापारी (Merchant) वर्गात मोठी दहशत निर्माण झाली आहे.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com