बिल्डरच्या चोरीने महावितरणचं पथकही चक्रावले; रिमोटच्या सहाय्याने केली चक्क ९८ लाखांची वीजचोरी

बिल्डरने जवळपास २ लाख ४ हजार २९२ युनिट वीज वापरल्याची माहिती समोर आली आहे.
MSEDCL Power Theft News In Pune
MSEDCL Power Theft News In PuneSaam TV

पुणे : पुण्यातील एका बिल्डरणे रिमोटच्या सहाय्याने जवळपास ९८ लाख रुपयांची वीज चोरी (Electricity Theft) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडच्या उड्डाण पथकाने ही वीज चोरी उघडकीस आणली आहे. (Maharashtra State Electricity Distribution Company Limited)

महावितरणच्या (MSEDCL) अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, सदर बिल्डरचे ज्या ठिकाणी इमारतीचे बांधकाम सुरु होते. त्या ठिकाणी बिल्डरणे मुळ वीज मीटरशी छेडछाड करत रिमोटच्या सहाय्याने जवळपास ९८ लाख रुपयांची वीज चोरी केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही वीजचोरी मागिल १८ महिन्यांपासून सुरु होती. रवी ओचनी यांच्या जागेवर ही घटना घडत असल्याचं आता समोर आलं आहे.

पाहा व्हिडीओ -

दरम्यान, वीज चोरी झालेल्या ठिकाणची पाहणी करायला गेलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं, 'सदर बिल्डरणे मुळ मीटरशी छेडछेड करत त्या जागी दुसरं मीटर बसवलं होतं. त्या मीटरवर कोणताही डिस्प्ले किंवा सील नव्हते. याबाबत महावितरणच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळावरील कर्मचार्‍यांना जाब विचारला असता त्यांनी मूळ मीटर अधिकाऱ्यांकडे दिले.'

शिवाय या ठिकाणी एक रिमोट सर्कीट सापडलं, जे मुळ मीटरच्या जागी जोडलेल्या बनावट मीटरला जोडलेलं होते. ते रिमोट वीज जोरी करण्याच्या उद्देशाने बसविण्यात आलं होतं अशी माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, या सर्व तपासानंतर बिल्डरने २ लाख ४ हजार २९२ युनिट वीज वापरल्याची माहिती समोर आली आहे. या वीजचोरी प्रकरणी पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad Police) पोलिसांतर्गत रावेत पोलिस ठाण्यात बिल्डरविरुद्ध (Ravet police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे उपसंचालक शिवाजी इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उड्डाण पथकाचे उपकार्यकारी अभियंता अनिल कुराडे, सहायक सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी शुभांगी पतंगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com