नवी मुंबईत माणुसकीला काळिमा फासणारी घटना, प्लास्टिक पिशवीत मृतदेहाचे तुकडे

मृतदेह पुरुष असून 30 ते 35 वयाची बोलला जात आहे
नवी मुंबईत माणुसकीला काळिमा फासणारी घटना, प्लास्टिक पिशवीत मृतदेहाचे तुकडे
नवी मुंबईत माणुसकीला काळिमा फासणारी घटना, प्लास्टिक पिशवीत मृतदेहाचे तुकडेविकास मिरगणे

मुंबई - नवी मुंबई Navi Mumbai एपीएमसी APMC परिसरात एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या परिसरमध्ये गटारमधून निळ्या रंगाच्या प्लास्टिक पिशवीमध्ये एक मृतदेह Deathbody आढळून आला आहे. पिशवीमध्ये या मृतदेहाचे तुकडे असल्याची माहिती समोर आली आहे. हा मृतदेह एका 30 ते 35 वयाच्या पुरुषाचा असल्याची माहिती देण्यात आली आहे. तुकड्यात पुरुषाचा मृतदेह सापडल्याने नवी मुंबईत एकच खळवल उडाली आहे.

हे देखील पहा -

गटारीत असलेल्या या निळ्या पिशवीमधून सकाळपासून दुर्गंध येत होती. सुरुवातीला नागरिकांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र, हा दुर्गंध नकोसा झाल्यानंतर नागरिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होतं ती निळ्या रंगाची पिशवी उघडली. त्यावेळी या पिशवीमध्ये पुरुष मृतदेहाचे तुकडे आढळले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

नवी मुंबईत माणुसकीला काळिमा फासणारी घटना, प्लास्टिक पिशवीत मृतदेहाचे तुकडे
रेड्याच्या झुंजी लावून जुगार खेळल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

घटनास्थळी एपीएमसी पोलीस आणि श्वान पथक पोहोचले असून मृतदेहाचा पंचनामा केला. पुढील तपस पोलिसांकडून करण्यात येत असनू एपीएमसी पोलिसांनी निळ्या पिशवीमधील मृतदेह वाशी रुग्णालयात पोस्टमार्टेम साठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. हे मृतदेह सध्या अज्ञात असून ओळख पटवण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. या प्रकरणाचा पोलीस अनेक बाजूंनी घटनेचा तपास करत आहेत. तसेच परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत का? त्याची देखील शहानिशा पोलीस करत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com