१४ गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करा...

१४ गाव सर्व पक्षीय विकास समितीची नगरविकास मंत्र्यांकडे मागणी...
१४ गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करा...
१४ गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करा...प्रदीप भणगे

डोंबिवली - नवी मुंबई (Navi Mumbai) महापालिकेतून (Municipal Corporation) वगळलेल्या १४ गावांना पुन्हा नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. यासाठी  १४ गावातील ग्रामपंचायत निवडणुकांवर (Elaction) देखील स्थानिकांनी तीनदा बहिष्कार टाकला आहे. गेल्या दोन वर्षांपासून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेण्याचे प्रयत्न विकास समिती करत होती.

हे देखील पहा -

अखेर सोमवारी पालकंमत्री एकनाथ शिंदे यांनी १४ गाव सर्व पक्षीय विकास समितीला भेट देत त्यांचे म्हणणे जाणून घेऊन निवेदन स्वीकारले आणि पालकमंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. नवी मुंबई महापालिकेतून लागलेल्या १४ गावांना पुन्हा नवी मुंबई महापालिकेत प्रवेश हवा आहे. यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सर्व पक्षीय विकास समिती पाठपुरावा करत आहे.अनेक वेळेला इतर विषय घेऊन आणि १४ गावांना पुन्हा नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करा हा विषय घेऊन १४ गावांमध्ये बैठकाही पार पडल्या आहेत.

१४ गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करा...
DCC त मविआ १६, भाजप १; जयश्री पाटलांवर जेसीबीने गुलालाची उधळण

मात्र अस असताना १४ गावातील जनतेच्या मागण्या शासन दरबारी धूळखात पडल्या आहेत.या साठी सर्व पक्षीय विकास समितीने अनेक नेत्यांच्या भेटी गाठी देखील घेतल्या आहेत.मात्र आपल्या मागण्या मान्य होत नसल्याने समिती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी धडपड करत होती. अखेर १४ गाव सर्व पक्षीय विकास समितीला सोमवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट दिली आणि १४ गावातील समस्यांचा पाढा वाचून दाखवत नवी मुंबई महापालिकेच्या समाविष्ट करण्याची मागणी समितीने केली आहे.पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असे १४ गाव सर्व पक्षीय विकास समिती अध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी सांगितले.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com