नवाब मलिक यांना दिलासा नाहीच; पुन्हा कोठडीत वाढ

मनी लाँड्रिंग प्रकरणात विशेष ईडी न्यायालयाने महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री तथा राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते नवाब मलिक यांच्या कोठडी वाढ केली आहे.
नवाब मलिक यांना दिलासा नाहीच; पुन्हा कोठडीत वाढ
Nawab Malik, ED RaidSaam TV

मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणात विशेष ईडी न्यायालयाने महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री तथा राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या कोठडीत 20 मे पर्यंत वाढ केली आहे. मंत्री नवाब मलिक यांच्या कोठडी संदर्भात मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयात सुनावणी झाली यावेळी न्यायालयाने त्यांच्या कोठडीत वाढ केली आहे. तसंच ईडीने (ED) मलिकांच्या प्रकरणात ५ हजारांपेक्षा अधिक पानी आरोपपत्र कोर्टात दाखल केलं आहे.

नवाब मलिक हे सध्या कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंधित लोकांशी पैशांचा गैरव्यवहार (money laundering case) प्रकरणात सध्या तुरुंगात असून त्यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. मलिक यांना आज, पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्यांना २० मे पर्यंत कोठडीत वाढ केली आहे.

दरम्यान, मलिक यांना अटक झाल्यापासून ते तुरुंगातच आहेत. त्यांच्या अडणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून यापुर्वीच ईडीने त्याच्या संपत्ती ईडीने जप्त केली आहे. शिवाय मलिक यांची प्रकृती देखील खालावत असल्याचं त्यांच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं होतं.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.