
मुंबई: मनसेचे नेत संदीप देशपांडे यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरासमोरुन संदीप देशपांडे यांना पोलीस ताब्यात घेत असताना देशपांडे यांनीश पळून जाण्याचा प्रयत्न केला. या धावपळीत त्यांच्यासोबत असलेले संतोष धुरी यांच्या धक्क्यामुळे मुंबई पोलीस दलातील एक महिला कॉन्स्टेबल खाली पडल्या. याबाबत आता संदीप देशपांडेंच्या अडचणींत वाढ होऊ शकते. गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी देशपांडेंविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. (Increase in difficulties of Sandeep Deshpande Order of Inquiry into Misbehave of Women Police)
हे देखील पाहा -
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आज मुंबई पोलीस दलातील महिला अधिकारी यांचेशी केलेल्या गैरवर्तनाबद्दलची माहिती मी घेतली असून सदरच्या घडलेल्या गंभीर प्रकाराबद्दल तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश मुंबई पोलीस आयुक्त श्री. संजय पांडे यांना दिले आहेत.
शंभूराज देसाई, गृहराज्य मंत्री
नेमकं काय घडलं होतं?
संदीप देशपांडे, संतोष साळी आणि संतोष धुरी शिवतीर्थावर (Shivteertha) दाखल झाले होते. यानंतर माध्यमांना प्रतिक्रया देत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. या धडपडीत एका महिला पोलीस कॉन्स्टेबल मनसे (MNS) नेते संतोष धुरी (Santosh Dhuri) आणि संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांना अडवत असताना संतोष धुरी यांनी महिला कॉन्स्टेबलला (Female constable) धक्का दिला, त्यामुळे त्या जमिनीवर पडल्या. अशात माध्यमकर्मींच्या गर्दीचा फायदा घेत संदीप देशपांडेंनी यातून पलायन केले. या दोन्ही नेत्यांनी पळ काढल्यानंतर पोलिसांनी इतर उपस्थित मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
संदीप देशपांडे कालपासून मंध्यमांच्या समोर येत नव्हते. मात्र आज संदीप देशपांडे, संतोष धुरी शिवतीर्थावर संतोष साळी हे अचानक शिवतीर्थ बंगल्यावर दाखल झाले मात्र त्यांनी पोलिसांच्या हातावर तुरी देत पळ काढला आहे. मात्र यादरम्यान महिला पोलिसासोबत घडलेल्या घटनेमुळे देशपांडेंच्या अडचणींत वाढ होणार आहे. ४ मे नंतर जर मशिदींवरील भोंग्यावर सरकारकडून कारवाई झाली नाही तर आपण मशिंदीसमोर हनुमान चालीसा लावणार असल्याचं मनेसकडून सांगण्यात आलं होत. आज मनसेने दिलेला तो अल्टिमेटमची मुदत संपली असल्याने काही ठिकाणी मनसैनिक (MNS) आक्रमक झाले होते. लाऊडस्पीकर्सचा वापर करत मनसेकडून हनुमान चालिसाचं पठण करण्यात आलं. शिवाय मशिद परिसरात मनसे कार्यकर्त्यांकडून जय श्रीराम ची घोषणाबाजी देखील करण्यात आल्या.
Edited By - Akshay Baisane
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.