किरण गोसावीच्या अडचणींमध्ये वाढ; 'त्या' जुन्या प्रकरणाचा झाला उलगडा

आर्यन खान ड्रग्स प्रकरणात NCB ने किरण गोसावीला साक्षीदार बनविल्यानंतर वृत्तवाहिनीवर सुरू असलेल्या बातम्या दरम्यान आर्यन खानसोबत सेल्फी घेतलेल्या गोसावीला उत्कर्ष तरे यांने पाहिले.
किरण गोसावीच्या अडचणींमध्ये वाढ; 'त्या' जुन्या प्रकरणाचा झाला उलगडा
किरण गोसावीच्या अडचणींमध्ये वाढ; 'त्या' जुन्या प्रकरणाचा झाला उलगडाSaamTV

पालघर : पालघर जिल्ह्यातील एडवण येथील उत्कर्ष तरे व आदर्श किणी (Utkarsh Tare and Adarsh ​​Kini) या दोन तरुणांना मलेशिया येथें नोकरी देतो असं सांगून त्यांच्याकडून दीड लाख रुपयेची रक्कम किरण गोसावी (Kiran Gosavi) यांने बँक खात्यामार्फत घेतली होती. गोसावी नवी मुंबईमधील K.P इंटरप्राईजेस ऑफिसमधून सर्व सूत्रं हलवत असे.

हे देखील पहा -

उत्कर्ष तरे व आदर्श किणी या मुलांना तिकीट आणि व्हिसा (Tikit And Visa) दिल्यानंतर ते विमानतळावर गेले मात्र ते तिथे गेल्यावरती त्यांना दिलेले तिकीट आणि व्हिसा बनावट असल्याचे त्यांना कळाल्यावरती त्या दोघांनी केळवे पोलीसांकडे (Kelve police) तक्रार दाखल केली होती. तरुणांकडे असणारे पुरावे पाहता आरोपी गोसावी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल होणे अपेक्षित असताना देखील पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले नव्हते.

मात्र आर्यन खान (Aryan Khan) ड्रग्स प्रकरण (Drugs Case) पुढे आल्यानंतर आर्यन खान ड्रग्स प्रकरणात एनसीबीने किरण गोसावी याला साक्षीदार बनविल्यानंतर वृत्तवाहिनीवर सुरू असलेल्या बातम्या दरम्यान आर्यन खानसोबत सेल्फी घेत असलेला किरण गोसावी ह्याला उत्कर्ष तरे यांनी पाहिल्यावर आपली फसवणूक केलेली व्यक्ती हीच आहे, याची खात्री त्याला पटली आणि दोन्ही तरुणांनी तात्काळ केळवे पोलीस स्टेशन गाठून आपली फसवणूक करणाऱ्या गोसावी विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

किरण गोसावीच्या अडचणींमध्ये वाढ; 'त्या' जुन्या प्रकरणाचा झाला उलगडा
धक्कादायक : विवाहितेचा मृत्यू, अंगावरती मारहाणीचे व्रण; पतीसह सासरची मंडळी फरार

दरम्यान, अनेक गुन्हे दाखल असलेल्या गोसावीला NCB ने साक्षीदार बनविल्याच्या प्रकरणाबाबत मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आक्षेप घेतल्याने NCB अधिकारी अडचणीत सापडले होते. त्यातच या प्रकरणात गृह विभागाकडून पालघर पोलिसांवर दबाव वाढल्याने अखेर केळवे पोलीस ठाण्यात किरण गोसावी विरोधात भादंवि कलम 420,406,465,467,471 कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता.पुणे पोलिसांनी किरण गोसावी याला अटक केल्यानंतर आत्ता केळवे पोलिसांनी काल रात्री किरण गोसावी ला ताब्यात घेतले असून आज न्यायालयात हजर करण्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com