सणासुदीत महागाईचा भडका झाला कमी; औद्योगिक विकासदरात मोठी वाढ

दसरा, दिवाळीच्या तोंडावर सामान्य नागरिकांकरिता मोठा दिलासा देण्यात आला
सणासुदीत महागाईचा भडका झाला कमी; औद्योगिक विकासदरात मोठी वाढ
सणासुदीत महागाईचा भडका झाला कमी; औद्योगिक विकासदरात मोठी वाढSaam Tv

मुंबई : दसरा, दिवाळीच्या तोंडावर सामान्य नागरिकांकरिता मोठा दिलासा देण्यात आला आहे. भारतात किरकोळ महागाईचा दर Retail Inflation हा मागील ५ महिन्यात सर्वाधिक कमी म्हणजे ४.३५ टक्के इतका करण्यात आला आहे. खाद्य पदार्थांच्या महागाई दरामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे त्याचा परिणाम एकूण महागाई दरावर झाला असल्याचे बघायला मिळत आहे.

तसेच औद्योगिक विकास दरात वाढ झाली असल्यामुळे तो ११.९ टक्क्यांवर येऊन पोहोचला आहे. खाद्य पदार्थांच्या महागाईचा दर हा कन्झ्युमर फूड प्राईस इन्डेक्स Consumer Food Price Index-CFPI यावर आधारित राहत आहे. खाद्य पदार्थांचा महागाई दर हा मागील ७ महिन्यात सर्वात कमी आहे. या ऑगस्टमध्ये तो ३.१ टक्के इतका होता. यामध्ये आता ०.६८ टक्क्यांची घट करण्यात आली आहे.

हे देखील पहा-

भाजीपाल्याच्या महागाईच्या दरात मोठी घट झाली आहे. ती आता २२.५ टक्क्यांवर येऊन थांबली आहे. खाद्य तेलाच्या दरामध्ये ३४.२ टक्के तर डाळी, अंडी आणि मांस यांच्या महागाईमध्ये ७ ते ८.७५ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. कोअर इन्फ्लेशनचा भाव हा ५.८ टक्क्यावर आहे. कोअर इन्फ्लेशनमध्ये खाद्य पदार्थ, इंधन दर यांचा समावेश नसतो. अर्थतज्ज्ञांच्या मते, येणाऱ्या काळात महागाई दरात चढ- उतार होण्याची शक्यता वर्तवली आहे.

सणासुदीत महागाईचा भडका झाला कमी; औद्योगिक विकासदरात मोठी वाढ
Mumbai: मंदाकिनी खडसेंविरोधात अटक वॉरंट... (पहा व्हिडिओ)

कारण महागाई दर हा उर्जा, धातू आणि लॉजिस्टिक कॉस्ट यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. मागील वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात औद्योगिक विकास दर हा ७.१ टक्के इतका होता. तो आता वाढला असून या ऑगस्टमध्ये तो ११.९ टक्के इतका झाला आहे. यामुळे कोरोना काळात मंदावत असलेली भारतीय अर्थव्यवस्था आता रुळावर येताना दिसून येत आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com