Sanitary Napkin : सॅनटरी नॅपकीनमध्ये रसायनांचा अधिक वापर; महिलांना होऊ शकतात 'हे' आजार

भारतात विकल्या जाणाऱ्या सॅनटरी नॅपकीनमध्ये रसायनांचा अधिक वापर केला जात असल्याची माहिती समोर आली आहे.
sanitary napkins
sanitary napkins saam tv

शिवाजी काळे

Sanitary Napkin News : भारतात विकल्या जाणाऱ्या सॅनटरी नॅपकीनमध्ये रसायनांचा अधिक वापर केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व रसयानांच्या अधिक वापरामुळे महिलांना हृदयविकार, मधुमेह आणि कॅन्सरचा धोका होण्याची शक्यता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 'टॉक्सिक लिंक' या एनजीओने केलेल्या संशोधनात ही महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

sanitary napkins
Skin Care Tips : त्वचेसाठी रेटिनॉलचा वापर करताय? होऊ शकते हानी, अशावेळी त्वचेची काळजी कशी घ्याल?

भारतात विकल्या जाणाऱ्या सॅनिटरी नॅपकीनमध्ये रसायनांचा अधिक वापर होत असल्याची माहिती समोर आली आहे. या नॅपकीनच्या वापरामुळे हृदय विकार, मधुमेह आणि कॅन्सर आजाराची धोका होण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे.

'टॉक्सिक लिंक' या एनजीओने केलेल्या संशोधनातून ही महत्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे. 'टॉक्सिक लिंक' या एनजीओने केलेल्या संशोधनात सॅनटरी नॅपकिनसाठी मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे रसायन महिलांसाठी घातक असल्याचे निष्पन्न झाले आहे.

'टॉक्सिक लिंक' चे प्रोग्राम कोऑर्डिनेटर डॉक्टरने या संशोधनाबाबत सांगितले की, 'ही माहिती धक्कादायक आहे. देशात सहज मिळणारं सॅनटरी नॅपकीनमध्ये रसायन मोठ्या प्रमाणात आहे. हे नॅपकीन आरोग्यासाठी घातक आहे. या नॅपकीनमध्ये कारसिनोजन, रिप्रोडक्टिव टॉक्सिन, एंडोक्राइन डिसरप्टर्स आणि एलरजीन्स आढळून आले आहेत.

sanitary napkins
Fuel Price : पेट्रोल-डिझेलच्या किमती 5 रुपयांनी कमी होऊ शकतात; काय आहे कारण?

'टॉक्सिक लिंक' चे दुसरे प्रोग्राम कोऑर्डिनेटर आकांक्षा मेहरोत्रा यांनी सांगितले की, 'हे सॅनिटरी नॅपकीन वापरल्यामुळे गंभीर आजार होऊ शकतात. या सॅनिटरी नॅपकीनमुळे महिलांच्या योनीवर रयायनांचा गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या सॅनिटरी नॅपकीनचा धोका अधिक आहे'.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com