अय.... मोबाइल बंद कर पहिले, जरा भानावर ये; भर कीर्तनात इंदोरीकर महाराज संतापले

आपल्या विनोदी शैलीतून किर्तन करून समाजाला प्रबोधनाचे धडे देणाऱ्या इंदोरीकर महाराजांनी मोबाईल आणि यूट्यूब चॅनेलचा चांगलाच धसका घेतला आहे.
अय.... मोबाइल बंद कर पहिले, जरा भानावर ये; भर कीर्तनात इंदोरीकर महाराज संतापले
Indurikar MaharajSaam Tv

पुणे - आपल्या विनोदी शैलीतून किर्तन करून समाजाला प्रबोधनाचे धडे देणाऱ्या इंदोरीकर महाराजांनी मोबाईल आणि यूट्यूब चॅनेलचा चांगलाच धसका घेतला आहे. किर्तन सुरू होण्यापूर्वीच इंदोरीकर महाराज (Indurikar Maharaj) मोबाईल आणि युट्युब चॅनेलवाल्यांना चांगलेच फैलावर घेताना दिसत आहे.

माझ्या विधानांचा विपर्यास केला जात असून प्रसिद्धीसाठी टीआरपीसाठी मला बदनाम केलं जात आहे. माझ्या किर्तनात कोणालाही दुखवण्याचा हेतू नसतो. मी समाज सुधारण्यासाठी आपल्या माणसांना, बोलतो असे इंदुरीकर यांनी आपल्या किर्तनात म्हटले असून पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात कीर्तनावेळी इंदोरीकर महाराजांनी हे विधान केलं आहे. अय.. मोबाइल बंद कर पहिले, जरा भानावर राहत जा, शिरूरमध्ये कीर्तन सुरू असतानाच इंदोरीकर महाराजांनी सुनावले.

हे देखील पाहा -

राज्यभर इंदोरीकर महाराज यांची कीर्तने होत असतात. कीर्तनाच्या माध्यमातून आपण समाजप्रबोधन करत असल्याचे इंदोरीकर महाराज यांचे म्हणणे आहे. तसेच कोणी वेगळ्या मार्गाला लागले तर त्याला मार्गावर आणण्याचा प्रयत्न कीर्तनातून केला जातो. पण स्वत:च्या फायद्यासाठी, टीआरपीसाठी कोणी मला बदनाम करत असेल तर ते योग्य नाही असे म्हणतानाच मोबाइवर कीर्तनाचा व्हिडिओ घेणाऱ्यांना यावेळी चांगलाच दम दिला. मोबाइल बंद कर पहिले, असे म्हणत त्यांनी मोबाइल आणि यूट्यूबवर कीर्तनाचा व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांवर आपला संताप व्यक्त केला. यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड केला तर पाहा, असा दम देतानाच आपल्या पोटापुरते पाहायचे, असे देखील इंदोरीकर महाराज यावेळी म्हणाले.

Indurikar Maharaj
रसमलाईवरून लग्नमंडपात सप्तपदीआधी घडलं अघटीत; वाद झाल्यानंतर...

दरम्यान याआधी आपल्या कीर्तनाच्या व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड करुन 4000 लोक कोट्यधीश झाली आहे या लोकांमुळेच आपण अडचणीत आलो असून अशांची मुलं दिव्यांग जन्माला येतील असे वादग्रस्त वक्तव्य इंदुरीकर महाराजांनी अकोल्यात केले होते. माझ्याच किर्तनाच्या क्लिप बनवून मलाच कोर्टात खेचलं. यांचं वाटोळच होणार यांचं कधीच चांगलं होणार नाही असे देखील ते म्हणाले होते.

वादग्रस्त वक्तव्यांवरुन इंदुरीकर महाराज यापूर्वीही अनेकदा वादात अडकले आहेत. २०२०मध्ये त्यांनी सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते आणि स्त्रीसंग जर अशीव वेळेला झाला तर मुलं बेवडी, रांगडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात असं म्हटलं होतं. त्यानंतर त्यांचे हे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडले हो. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. मात्र आता न्यायालयानं इंदुरीकरांना दिलासा दिला असून खटला रद्द करण्यात आला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com