इंदुरीकर महाराज अडचणीत; 'ते' वक्तव्य भोवणार?

इंदुरीकर महाराज पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्याने अडचणीत आले आहेत.
इंदुरीकर महाराज अडचणीत; 'ते' वक्तव्य भोवणार?
Indurikar Maharaj Latest Marathi News, Indurikar Maharaj controversial statementSaam Tv

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

पुणे - अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्याने अडचणीत आले आहेत. पुण्यातील दोन जणांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत दिव्यांग कल्याण आयुक्तांनी तक्रारीची चौकशी करून दोषी आढळल्यास कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, असे आदेश पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. (Indurikar Maharaj Latest Marathi News)

हे देखील पाहा -

याविषयी राजेंद्र वाकचौरे व दत्तात्रय भोसले यांनी तक्रार केली आहे. अकोला येथे झालेल्या कीर्तनात इंदुरीकर यांनी माझ्या कीर्तनाचे व्हिडिओ वाहिनीवर टाकणाऱ्यांची मुले दिव्यांग जन्माला येतील, असे म्हटल्याचे वाकचौरे व भोसले यांचे म्हणणे आहे. तसे निवेदन व तक्रार त्यांनी दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे दिले. इंदुरीकर यांच्या वक्तव्यामुळे दिव्यांग व्यक्तींच्या भावना दुखावल्या. दिव्यांग व्यक्ती हक्क कायद्यानुसार हा गुन्हा आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी वाकचौरे व भोसले यांनी दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे केली आहे.

Indurikar Maharaj Latest Marathi News, Indurikar Maharaj controversial statement
भीषण अपघातात दोघे ठार; बीड जिल्ह्यातील घटना

दिव्यांग कल्याण आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांनी त्याची दखल घेतली. त्यानुसार त्यांनी अकोले पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी तक्रारीची प्रत जोडून याची चौकशी करावी, अशी सूचना पोलीस अधीक्षकांना केली आहे. आसपास विचारणा करावी. दोषी आढळल्यास दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६मधील कलम ९२ (अ) नुसार त्वरित गुन्हा दाखल करण्याची कारवाई करावी, असा आदेशही त्यात देशमुख यांनी दिला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.