PCMC आयुक्तांच्या कार्यालयावर भाजपच्या नगरसेविका आशा शेडगेंनी फेकली शाई

आयुक्तांच्या अंगावर शाई फेकण्याचा हेतू होता मात्र ती शाई महिला कर्मचाऱ्यांच्या अंगावर पडली.
PCMC आयुक्तांच्या कार्यालयावर भाजपच्या नगरसेविका आशा शेडगेंनी फेकली शाई
PCMC आयुक्तांच्या कार्यालयावर भाजपच्या नगरसेविका आशा शेडगेंनी फेकली शाईSaamTV

पिंपरी - चिंचवड : महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या कार्यालयाच्या बाहेरील असणाऱ्या नावाच्या पाटीवर आशा शेंडगेच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकत चांगलाच गोंधळ घातला आहे याप्रकरणी भाजप नगरसेविका आशा शेडगेसह काही महिलांना पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.(Ink thrown at PCMC Commissioner's Office)

हे देखील पहा-

आशा शेडगे यांच्या प्रभागातील दापोडी परिसरात पालिकेच्या ठेकेदाराकडून स्मार्ट सिटीची कामासाठी खोदकाम केलं जातं आहे. पोलिस प्रोटेक्शन मध्ये आशा शेंडगे यांच्या प्रभागात स्मार्ट सिटीच खोदकाम करण्यात येत आहे. मात्र या खोदकमाचा त्रास नागरिकांना होतोय. असा दावा करत नगरसेविका शेडगे काही महिलांना घेऊन आयुक्त कार्यालयासमोर पोहचल्या.

शेडगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा आयुक्तांच्या अंगावर शाई फेकण्याचा हेतू होता मात्र ती शाई महिला कर्मचाऱ्यांच्या अंगावर पडल्यामुळे या महिलांनी आयुक्तांच्या नावाच्या पाटीवरती शाई फेकली. त्यामुळे महापालिकेच्या इमारतीत काहीकाळ गोंधळ उडाला होता.

PCMC आयुक्तांच्या कार्यालयावर भाजपच्या नगरसेविका आशा शेडगेंनी फेकली शाई
आंबेओहळ प्रकल्पाच्या पाण्याला राजकीय वळण; श्रेयवादावरुन हसन मुश्रीफांची चंद्रकांत पाटलांवर टीका

दरम्यान पोलिसांना पाचारण केल्यानंतर पोलिसांनी भाजप नगरसेविका शेडगे सह अन्य महिलांना ताब्यात घेतलं आहे. तसेच आशा शेडगे यांनी केलेले कृत्य हे लोकशाही मार्गाला शोभणार नसून आम्ही त्यांच्या कृत्याची निंदा करतो. असं पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपने म्हटलं आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com