Inter religion marriage Video : हिंदू मुलगा आणि मुस्लिम मुलीची अनोखी कहाणी; लोणावळ्यात असा पार पडला आगळावेगळा विवाह सोहळा

देशात दोन समाजातील दुरावा कमी करणाऱ्या लोणावळ्यामधील अनोख्या विवाहाची चर्चा होत आहे.
Inter religion marriage Video
Inter religion marriage VideoSaam tv

Inter Religion Marriage : राज्यासह देशात दोन समाजामध्ये तेढ झाल्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे देशातील काही भागात दोन समाजामध्ये कटुता वाढल्याची पाहायला मिळत आहे. याचदरम्यान, देशात दोन समाजातील दुरावा कमी करणाऱ्या लोणावळ्यामधील अनोख्या विवाहाची चर्चा होत आहे. (Latest Marathi News)

Inter religion marriage Video
Viral Video: ट्रेन पाहून प्रवाशांचा आनंद गगनात मावेना; तब्बाल ९ तास पाहावी लागली वाट

लोणावळ्यात हिंदू-मुस्लिम एकतेच प्रतीक म्हणून गुजर आणि शीखलगार या दोन्ही कुटुंबांनी आंतरजातीय विवाह (Marriage) केला आहे. हिंदू मुलगा आणि मुस्लिम मुलगी आहे. या दोघांच्या विवाहाचा विषय देशभर चर्चेचा विषय ठरत आहे. राज्यासह देशात दोन समाजामध्ये तेढ वाढत असताना दोन्ही कुटुंबाच्या निर्णयाचं कौतुक होत आहे.

या विवाहाची विशेष बाब म्हणजे म्हणजे मुलाला आई वडील नाही. काकानेच पालन पोषण करून लग्न करून दिलं. आम्ही जातीभेद मानत नाही. राजकारणी स्वतःच्या फायद्यासाठी दोन समाजात तेढ निर्माण करीत असतात ते कुठेतरी थांबायला पाहिजे, असे मत कुटुंबातील सदस्यांनी व्यक्त केले.

Inter religion marriage Video
Saam TV Achieving Award : साम टीव्हीला लाडली चा राष्ट्रीय पुरस्कार ; पाहा व्हिडीओ

शीखलगार हे सांगली जिल्हातीत विटा या गावचे मात्र यांचे बंधु मुंबईमध्ये वास्तव्यास आहे. गुजर आणि शीखलगर कुटुंबाला जोडणारी सीमरण आणि नीरज यांनी दोन्ही कुटुंबाला एकत्रित आणले आहे. हा अनोखा विवाह सोहळा लोणावळ्यात पार पडला. मुस्लिम आणि हिंदूमधील दूरावा कमी झाला पाहिजे हा संदेश या विवाहाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com