अनिल बोंडेंच्या घरासमोर आंतरधर्मीय विवाह लावणार; छात्रभारतीचा इशारा

आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या तरुण-तरुणींसोबत छात्रभारती खंबीरपणे उभी आहे.
MP Anil Bonde
MP Anil BondeSaam TV

रुपाली बडवे -

मुंबई: भाजपचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे (MP Anil Bonde) यांनी आंतरधर्मीय विवाहाविरोधात खाजगी विधेयक मांडणार असल्याचे मत व्यक्त केले. सर्वच आंतरधर्मीय विवाह हे फसवून, धमकावून होत नाहीत हे ठणकावून सांगण्यासाठी येणाऱ्या काळात अनिल बोंडे यांच्या घरासामोरच छात्रभारती आंतरधर्मीय विवाह (Interfaith Marriage) लावून देणार असल्याचे छात्रभारतीचे राज्याध्यक्ष रोहित ढाले यांनी सांगितलं आहे.

मुलींना प्रलोभने देऊन, गिफ्ट देऊन धमक्या देऊन मुलींना पळवून असे विवाह जिल्ह्याबाहेर होतात असेही बोंडे म्हणाले आहेत. लोकप्रतिनिधींनी असे बेजबाबदारपणे बोलणे हे निंदणीय आहे. छात्रभारती विद्यार्थी संघटना अशा सर्व आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या तरुण-तरुणींसोबत खंबीरपणे उभी असल्याचंही ढाले यांनी यावेळी सांगितलं.

पाहा व्हिडीओ -

ह्या सर्व वक्तव्यामागचा सूर हा धर्मांध आहे. दोन धर्मा-धर्मांमधे विष पेरण्याचा कट आहे. देशाच्या शांततेला धक्का पोहचवून आपले मतांचे गणित टिकवण्याचा हा केविलवाणा प्रयोग असल्याचंही ते म्हणाले आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com