आयर्नमन विजेत्यांनी पोलिसांना दिले फिटनेसचे धडे
आयर्नमन विजेत्यांनी पोलिसांना दिले फिटनेसचे धडे अश्विनी जाधव- केदारी

आयर्नमन विजेत्यांनी पोलिसांना दिले फिटनेसचे धडे

समर्थ पोलीस स्टेशनचा अभिनव उपक्रम

पुणे : सतत धावपळ आणि चिंताग्रस्त नोकरी करणाऱ्या पोलिसांना फिटनेस गरजेचे आहे. त्याकरिता दररोज व्यायाम करणे आवश्यक आहे. सध्या तर गणेशोत्सवाच्या काळात पोलिसांची जबाबदारी अधिक वाढली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देणे देखील गरजेचे आहे. या हेतूने पुण्यातील समर्थ पोलीस स्टेशन अंतर्गत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

हे देखील पहा-

तब्बल 28 वेळा आयर्नमॅन झालेल्या डॉ. कौस्तुभ राडकर यांच्यासह इतर ३ आयर्नमॅन विजेत्यांचे मार्गदर्शनखाली व्याख्यान पोलिसांना देण्यात आले आहे. यामध्ये वयाच्या 65 व्या वर्षी आयर्नमॅन झालेले जाधव यांचे मार्गदर्शन पोलिसांसाठी खूप महत्वाचे आणि प्रेरणादायी ठरले आहे. यापूर्वी ही पोलिसांचा फिटनेस रहावा आणि शहरातील गल्ली बोळात पेट्रोलिंग करणे, सोयीचे जावे. याकरिता समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सायकल पेट्रोलिंग सुरु करण्यात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com